तिसरी रात्र तर प्रत्यक्ष काळरात्रीपेक्षांहि भयाण वाटली त्यांना पाठीमागें भयानक जंगल पसरलें होतें. त्यांची सारी तपश्चर्या गिळून सुस्त झालेल्या हिंस्र जनावरासारखे ते घोरत पडले होते. समोर अनघा मृत्यूचें आमंत्रण देत क्रूरपणें फोफावून वहात चालली होती. अमावास्येची काळोखी रात्र होती ती. आभाळातली चांदण्याची लुकलुकहि त्यांना चेटकिणीच्या डोळ्यांसारखी भकास आणि तेजोहीन वाटली. त्या रात्रीची तळमळ संपता संपेना. पहाट होता होताच त्यांना जरा डोळा लागला. तोंच कुणीतरी अनामिक पक्षी त्यांच्या मस्तकावरून फडफडत गेला. त्यानं गोडशी शीळ घातली. इंद्रवदनांनी डोळे उघडले. समोर पूर्वेला क्षितिजाची कड तांबुस गुलाबी दिसत होती. त्या प्रसन्न लालीची मुक्त उधळपट्टी पूर्वेच्या समग्र आकाशावर झाली होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .