बायकांच्या सारासार बुद्धीवर पुरुष कधींहि विश्वास ठेवीत नाहीत. आणि बाई (विशेषतः बायको) शहाणी ठरली कीं पुरुषाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलीच म्हणून समजावी. नगरच्या सौ. दंडिगे या संदर्भात आपल्या पत्रांत म्हणतात, “एखादी गोष्ट किती अवघड आहे आणि ती येत्या दोन दिवसांत कशी केलीच पाहिजे याच वर्णन 'हे' लांब मुद्रेनं माझ्यापाशीं तासन् तास करीत बसतात, कपाळाला सतराशेअठ्ठावीस घड्या पाडतात, मोठे मोठे श्वास सोडतात. मग मला येतो कंटाळा. म्हणून मग सहज मी तीच गोष्ट करायची एखादी सोपी पद्धत यांना दाखवून देते. 'हे' अर्थात् तिकडे सुज्ञ मुद्रेने काणाडोळा करून आपल्याच चुकीच्या पद्धतीनं ती गोष्ट करतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .