महाराष्ट्राला वेड लावणारे पु. लं. चे 'तुझे आहे तुजपाशी' पांच वर्षापूर्वीचे आहे. जाहीरातीत त्यांचे नाव पाहताच कोणत्याहि मासिकाच्या दिवाळी अंकावर वाचकांच्या ज्या त्यांच्या रसील्या, दर्दभऱ्या आणि जिवंत व्यक्तिचित्रांच्यामुळे उड्या पडत ती व्यक्तिचित्रे त्यानी या पांच वर्षापूर्वीच्या काळातच मुख्यत्वे घडवली. अनामिकाची 'बटाट्याची चाळ' हि पांच वर्षापूर्वीची होय. असे असूनहि पु. लं. या नांवाचे आकर्षण वाढत्या श्रेणीने जे शिगेस पोहोचले आणि महाराष्ट्रास वेड लावून राहिले आहे ते गेल्या पांच वर्षातच विशेषेकरून होय. कारण असे कीं, 'दूधभात' बोलपटापासून पु. लं. चं कला-कसब सर्वांगानी जे प्रकटू लागलं ते बटाट्याच्या चाळीपर्यंत एकावर एक कळस चढवल्यागत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .