पूर्वार्ध - लाट

पुनश्च    हमीद दलवाई    2024-06-12 10:00:02   

यानंतर सुमित्रा गोखले नेहमीं माझ्या घरीं येऊन माझ्याशीं बोलत बसूं लागली. लेखकाशीं वैयक्तिक ओळख असणारा वाचक ज्या आपुलकीनं, आदरानं लेखकाविषयीं, त्याच्या साहित्याविषयीं बोलत असतो, त्या आदरानं सुमित्रा गोखले माझ्याशी रोज येऊन बोलू लागली. माझ्याशीं साहित्याचा वाद ती उकरून काढू लागली. साहित्याखेरीज इतर विषय तिला वर्ज्य नव्हते. संगीताचं चांगल्यापैकीं ज्ञान तिनं संपादन केलं होतं. नवकलेच्या उन्मेषावरील तिचे विचार एखाद्या अव्वल दर्जाच्या नवकलाकारानं व्यक्त करावेत अशा अभिरुचीचे होते. रागदारीवर बोलतांना मधूनच तिला गायची लहर येई आणि ती गाऊनहि दाखवी. अशा वेळीं निःस्तब्धपणें मी तें ऐकत असें आणि क्वचित् वेळीं तिची प्रशंसाहि करीत असें. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .कथा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen