रहस्यकारांच्या मताप्रमाणे ज्ञानभक्तियुक्त साम्यबुद्दीन कर्म करणें हेंच जर गीतेंत प्रतिपाद्य आहे असें धरिलें, तर त्याचा सामान्य जनांस उपयोग काय ? मी स्वतः कर्ता नव्हे अशी खरोखर भावना जर झाली तर, मी अमुक करूं की नको अशी अडचण उत्पन्न होणार नाही. अडचण उत्पन्न झाल्यावर अशी साम्यबुद्धि ताबडतोब प्राप्त होणें अशक्यच आहे. शाब्दिक ज्ञान होईल, परंतु त्यानें अहंकारनिवृत्ति होणार नाहीं. ज्ञानी पुरुषांनी अशा अशा प्रसंगी जसें वर्तन केलें तसेंच आपण करावे असें ह्मटल्यास, शेजारणीची सरी पाहून आपल्या गळ्यास दोरी बांधण्यापैकी प्रकार व्हावयाचा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .