नाशिक, पंढरपूर वगैरे लहान-मोठ्या क्षेत्रांच्या ठिकाणी भिक्षुकवर्ग फार असे. त्यांत स्वार्थी, मतलबी, कार्यसाधु अशा वृत्तीचेहि कांहीं भिक्षुक असून, ते धनिक लोकांची वाटेल तीं कामें द्रव्यलोभानें साध्य करून देण्यास तत्पर असत; मग तें कुकर्म आहे किंवा सत्कर्म आहे याचा ते कधीहि विचार करीत नसत! अशा जातीच्या एका भिक्षुकाची ('भद्रेश्वरा'ची ) भूमिका मास्तरांनीं 'शारदें'त रंगविली. तिजकरितां काशीनाथपंत परचुरे हे सर्वस्वी योग्य नट होते. अण्णासाहेबांच्या वेळेपासून 'मैत्रेया'ची विनोदी भूमिका ते करीत असत. शिवाय ते वांई क्षेत्रांतील कट्टर ब्राह्मण असून तेथें चालत असलेले 'जरठ-कुमारी विवाह' त्यांच्या पहाण्यांत असल्यामुळे, 'भद्रेश्वर दीक्षिता'ची भूमिका मास्तरांच्या कल्पनेप्रमाणें ते सहजसुलभतेनें, वठवीत असत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .