बारामतीस असतांना बालकवींची कविता आचार्यांच्या हातीं पडली. ती वाचून नांवानेसुद्धां लहान असलेल्या या कवीनें कविता केली, तर आपणच ती कां करूं नये, असे त्यांच्या बाल-मनांत आले. 'तेच कां? मी कां नाहीं?' या अहमहमिकेच्या भावनेंतच लोहकवींच्या काव्यलोहरसाचा उगम आहे. शिवाय बारामतीच्या शाळेतले आमचे जेरेमास्तर (परवांच वारले. ‘गृह्यसंस्कारां’त बातमी वाचली.) चालीवर कविता म्हणणाऱ्या मुलांस पेपरमिटाच्या गोळ्या बक्षिस देत असत. त्यांच्या हव्यासामुळे 'पोर खाटेवर..' किंवा 'क्षणोक्षणीं पडे...' इत्यादि कविता लोहकवि चालीवर म्हणून दाखवीत, त्याची कांटेरी आठवण अजूनहि आम्हांला विव्हळ करून सोडते !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .