बॉम्बे टॉकीजच्या जिद्दीपर्यंत देव शामळू हीरोतच जमा होत होता. पण शहीद लतिफ यांनी जिद्दीमध्ये त्याला तडफदार बनविला. त्या चित्राची लोकप्रिय नायिका कामिनी कौशल हिच्याशी अनेक प्रणय प्रसंगदेखील त्याने निर्भयपणे सजविले आणि 'बाजी 'मध्ये तर त्याचे व्यक्तिमत्वच पार बदलून गेले. धोतर-सदरावाला लाजाळू देव संपुष्टात आला. सुरैय्याच्या पदरा'चा आधार घेवून पुढे येऊ पाहत असलेला देव येथेच संपला व नवा तडफदार, चटकन भुरळ पाडणारा 'चिकना' पण तितकाच मर्दानी देव आनंद आकाराला आला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .