पण माझ्या नूतननं पडद्यावर यावं अशी माझी अंतरींची इच्छा आणि म्हणूनच मी प्रयत्नाला लागलें. नूतन त्या वेळी होती तेरा वर्षांची. पण तिची अंगकाठी उंच असल्यानं ती वयाच्या मानानं जरा थोराडच वाटे. नूतनसाठीच मी चित्रपट निर्माण करण्याचं ठरविलं. सुप्रसिद्ध सिनेनट श्री. मोतीलाल यांचेहि या कामी मला भरपूर सहकार्य लाभलं. मी "हमारी बेटी"च्या तयारीला लागलें. या चित्रपटात नूतनला नायिका बनविण्याचा मी ठाम निश्चय केला. तिला तसं बोलूनहि दाखविलं. प्रारंभी ती थोडीशी बावरली पण नंतर तिनंहि मनाशी ठरविलं की आपण मातेच्या इच्छेनुसार नायिका बनायचंच.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .