पण किती मुले झाल्यानंतर मनुष्याने ब्रह्मचर्य पालन करावें असा प्रश्न पुढे येईल. एक मूल झाल्यानंतर मनुष्याने ब्रह्मचर्य पालन करावें, कारण एक मूल झाले की, प्रजोत्पत्तीचे कर्तव्य संपतें व म्हणून त्यानंतर स्त्रीपुरुषांनी पूर्ण ब्रह्मचर्याने राहावे असे ते म्हणतील. स्त्रीला मूल झाल्यानंतर ती आई होते. म्हणजे त्यानंतर ती पत्नी राहात नाहीं. स्त्री माता झाल्यानंतर तिचे पत्नीत्वाचे नाते संपतें, कालिदासाने म्हटल्याप्रमाणे ह्यानंतर पत्नी 'गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधो,' गृहिणी, सखी, मित्र आणि शिष्या म्हणून पतीबरोबर काम करते, पत्नी हणून नव्हे. आणि याच्याहि पुढे जाऊन रामायणांत म्हटल्याप्रमाणें 'भगिनीवच्च मातृवच्च' बहिणीप्रमाणें आणि मातेप्रमाणें तिचा पतीशी संबंध राहील.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .