हरीके हे गांव फार प्राचीन काळापासून इतिहास प्रसिद्ध आहे. कोणी असें म्हणतात कीं, महाभारत लिहिल्यानंतर व्यास ऋषींनीं येथे कांहीं दिवस विश्रांति घेतली होती. कोणी असें म्हणतात कीं, या ठिकाणी वियास व सतलज या नद्यांचा संगम असल्यामुळे हिंदुस्थानांत आलेल्या आर्याच्या टोळीनें येथें वसाहत स्थापन केली. पण या सर्व प्राचीन कथानकांपेक्षां एका आधुनिक कथानकामुळे व कर्तृत्वामुळे स्थानाला भेट देण्याचें मी ठरविलें होतें. एक म्हणजे पाक व हिंदुस्थान यांतील सरहद्द हरिकेपासून कांहीं मैल दक्षिणेकडे गेल्यानंतर सतलजनें निश्चित झाली होती. तथापि हुसेनिवाला हेड वर्कस् व पाकिस्तानातील दिपालपूर कॅनॉलला पाणी मिळत होतें व जें पुढें हिंदुस्थान बंद करील अशी पाकला भीति वाटली म्हणून रॅडक्लिफनें उघड उघड हरिकेच्या खाली व फिरोझपूरच्यावर सतलजच्या पूर्व किना-यावर सुमारे दोन मैल लांब व अर्धामैल रुंद एवढा कमीजास्त प्रदेश पाकिस्तानला दिला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .