ते वस्त्र जीर्ण होते तरी त्या संबंधीची श्रद्धा महान् होती. गुरुनानक यांनी आपल्या धर्म प्रचारांत अवडंबराबद्दल निषेध केलेला आहे. वेडगळ समजुतीना मानू नये, असें सांगितले आहे. असें सांगतात की, मक्केला गेले असतांना पवित्र काबाकडे पाय करून ते झोपले होते. तेथील भक्तगण सहाजिकच रागावले, तेव्हां त्यांनी सांगितले की, मी थकलो आहे, तुम्ही पाय धरून वळवा ! असें सांगतात की, जिकडे पाय वळवावे तिकडे काबा दिसू लागे. यांतील मर्म येवढेच की, परमेश्वर सर्वव्यापी व सर्वसाक्षी आहे. वाराणसी क्षेत्रांत गेले असतांना भिक्षुक लोक यात्रेकऱ्याकडून पाण्याचे अर्घ्य वगैरे घेवून क्रिया करवीत व दक्षणा घेत. नानकांनी गंगेचे पाणी घेवून कांठावर फेकण्यास सुरुवात केली. एकाने विचारलें कीं, हें काय करीत आहांत ? त्याने उत्तर दिलें, " माझें शेत पंजाबात आहे. त्याला पाणी देत आहे." तेथल्या पंड्यानें सांगितलें की, 'वेड्या गृहस्था हजार मैल अंतरावर असलेल्या तुझ्या शेताला हें पाणी कसें पोंचेल?"
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .