‘मी देखील समाजवादी आहे' असे गांधीजी अनेकवार म्हणत असले किंवा बहुजनसमाजाने त्यांच्याकडे गरिबांचा, दुःखितांचा कैवारी म्हणून पाहिले असले तरी गांधीजी समाजवादी होते काय या प्रश्नाचे उत्तर देणें प्रथमदर्शनी वाटतें तितके सोपें नाहीं. कारण समाजवादी विचारसरणीचें तर्कशुद्ध विवेचन गांधीवाङ्मयांत कोठेच नाहीं. कार्ल मार्क्सनें ज्याप्रमाणें भांडवलदारी समाजरचनेचें आर्थिक, ऐतिहासिक व तात्त्विक दृष्ट्या विश्लेषण करून स्वप्रणीत समाजवादी समाजरचनेची ऐतिहासिक अपरिहार्यता सिद्ध करून दाखविली आणि एक नवीन समाजघटनाशास्त्र व क्रांतिशास्त्र निर्माण केलें, तसा शास्त्रीय मार्गाचा अवलंब गांधींनीं केल्याचे दिसत नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .