लोकशाही विरुद्ध हुकूमशाही


अंक -:  नवभारत १९७५ अर्थात लोकशाहीच का? १.  भारत स्वतंत्र होऊन २८ वर्षे झाली. नुकताच प्रजासत्ताकाचा रौप्य महोत्सव भारताने साजरा केला. तथापि, आर्थिकदृष्ट्या भारत फारच दुरवस्थेत आहे. मोठ्या प्रमाणात चलनवाढ, वस्तूंची साठेबाजी, चोरटा व्यापार, वस्तूंची दुर्मिळता, भाववाढ, बेकारी व भ्रष्टाचार असे भारताचे आजचे आर्थिक चित्र आहे. अशा या परिस्थितीत भारतात जर हुकूमशाही असती किंवा हितकारी (बेनिव्होलंट) हुकूमशहा असता तर हे प्रश्न निर्माण झाले नसते किंवा मागेच निकाली निघाले असते असे भारतामध्ये अनेक जणांना वाटते; आणि म्हणून अजूनही भारतात निदान काही काही काळाकरीता हुकूमशाही सुरू करणे इष्ट होईल असे या मंडळींचे म्हणणे आहे. अशा स्थितीत लोकशाही व हुकूमशाही यांच्या गुणावगुणांची तपासणी करणे आणि त्यांची वाटचाल कशी घडते याबाबतचाही विचार करणे अत्यंत आवश्यक व निकडीचे ठरते. २.  लोकशाहीवरील आक्षेप वर नमूद केल्याप्रमाणे अप्रगत राष्ट्रांबाबत लोकशाहीवरील किमान आक्षेप असा आहे की, वस्तूंची साठेबाजी, चणचण, उत्पादनात घट, भाववाढ, बेकारी, भ्रष्टाचार हे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किंवा त्यांचे निराकरण करण्यासाठी अप्रगत राष्ट्राने प्रथम हितकारी हुकूमशहाच्या हस्ते चांगले निर्णय करून घऊन आर्थिक प्रगती करून घ्यावी आणि नंतर पाहिजे तर लोकाशाहीचा कारभार सुरू करावा. यावर लोकशाहीची बाजू अशी आहे की वर उल्लेख केलेले दोष हुकूमशाही राष्ट्रांमध्येही असतात. कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये सुद्धा जीवनोपयोगी वस्तूंची चणचण, उत्पादनात घट या गोष्टी बहुतेक नेहमीच असतात कारण पोलाद, यंत्रे आदि अवजड वस्तू व युद्धोपयोगी वस्तूंची निर्मिती हे कम्युनिस्ट राजवटीचे उद्दिष्ट

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , राजकारण , नवभारत

प्रतिक्रिया

 1. atmaram jagdale

    2 आठवड्या पूर्वी

  छान लेख

 2. Kiran Joshi

    4 वर्षांपूर्वी

  अतिशय विचार प्रवर्तक लेख! लोकशाहीचे फायदे थीअरॉटीकलि चांगले असले तरीही ती राबवताना लागणारी प्रगल्भतेची अजूनही आपल्याकडे वानवा आहे. मर्यादित हुकूमशाहीपेक्षा अध्यक्षीय लोकशाहीचा पर्याय भारताने अजमावून बघावा असे वाटते कारण लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमुळे लोकप्रतिनिधींमध्ये व ती राबवणारऱ्या प्रशासनामध्ये स्पर्धा व समन्वयाचा अभाव अजूनही दिसतो. १९७५ अगोदरचा लेख जरी असला तरी आजही त्याचा संदर्भ लागू आहे.

 3. deepa_ajay

    4 वर्षांपूर्वी

  county like ours democracy is useless,

 4. डा व्यंकटेश अंबादास लिगदे

    4 वर्षांपूर्वी

  इन्दिरेच्या आणीबाणी पुर्वीचा हा लेख असावावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen