आपल्या लोकांच्या चालीप्रमाणे रजस्वला स्त्रिया अधम पातकी मानल्या आहेत हे, रजस्वला असता ज्या संज्ञा ऋषिमताप्रमाणे त्यास लावितात, त्यावरून उघड होते. स्त्री रजस्वला असता पहिल्या दिवशी तिला चांडाळी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातिणी, आणि तिसऱ्या दिवशी रजकी, अशा संज्ञा दिल्या आहेत. चौथ्या दिवशी स्नान करून शुद्ध झाली म्हणजे तिला ऋतुस्नान म्हणतात. असे मत प्रचारामध्ये स्थापित करण्याचा हेतू इतकाच दिसतो, की स्त्रिया रजस्वला असता त्यास स्पर्श होऊ नये व नेणेकरून स्त्रीपुरुष संयोगास प्रतिबंध व्हावा. कारण, तसा प्रतिबंध न झाला तर स्त्रियांच्या जननेद्रियांस अनेक रोग जडतात आणि पुरुषास ही रज:स्त्रावाच्या संपर्काने प्रमेहादि रोग उत्पन्न होतात. ह्या गोष्टी अज्ञानी लोकांच्या मनामध्ये सहज ठसविता येणार नाहीत, म्हणून रजोदर्शन स्थितीत स्त्रियांचे अधम स्वरूप दाखविले आहे. याखेरीज असे करण्याचा दुसरा काही हेतू दिसत नाही. आणि अज्ञानी लोकांशी जेथे गाठ आहे तेथे हीच युक्ति योग्य असे म्हणण्यास चिंता नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वी150 वर्षांपूर्वीचा लेख अजूनही चिंतनीय आहे म्हणजे परिस्थिती फारशी बदललेली नाही हे खरे आणि ही परिस्थिती स्त्रियांनीच बदलायला हवी हे निश्चित .
Rdesai
6 वर्षांपूर्वीछान लेख.अशीच माहिती लोकांच्या समोर सतत येत गेली तर नक्कीच मानसिकता बदलण्यास मदत होईल.
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीलोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे , प्रामुख्याने स्री यांचीच . लेख उत्तम .
Reewa
6 वर्षांपूर्वीदिडशे वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने हे विचार इतक्या परखडपणे मांडले, त्यांना सलाम! अर्थातच त्या काळात या लेखावर समाजातील प्रतिगामी प्रवृतींकडून कडाडून टीकाच झाली असणार. पण आजच्या काळात देखिल पॅडमॅन सारखे सिनेमे बनवावे लागणे, हे कशाचे द्योतक आहे? सगळयात वाईट गोष्ट म्हणजे अजूनही धार्मिक कार्य करायचे असल्यास, तथाकथित सुशिक्षित आणि स्वतःला आधुनिक म्हणवणाऱ्या तरुणी मासिक पाळी लांबवण्यासाठी रजस्राव प्रतिबंधक गोळया घेतात! असे करताना आपण निसर्ग नियमाविरुद्ध वागून स्वतःचेच नुकसान करत आहोत, हेदेखिल त्यांना समजत नाही! याला काय म्हणावे??
Parvani
7 वर्षांपूर्वीरजस्वला स्त्री विषयी मानसिकता बदलणे गरजेचे आहे
Siddheshwar
7 वर्षांपूर्वीमहिलांना आज तरी मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश देण्यास प्रत्यवाय नसावा
ratnakarkulkarni
7 वर्षांपूर्वीअप्रतिम एवढी प्रागतिक विचारसरणी तेही इतक्या जुन्या काळात. आश्चर्य आहे. लेखकाच नाव कळाल असत तर बर झाल असत
jaydeep
7 वर्षांपूर्वीलेख उत्तम आहे. वाईट ह्या गोष्टीचे वाटते की 150 वर्षात लोकांच्या मानसिकतेत फारसा फरक पडलेला नाही. बऱ्याच ठिकाणीआपला समाज ह्या विषयावर फारसा पुढारलेला नाही. किंबहुना ह्या विषयावर बोलणे अथवा लिहिणे हे ही वर्ज्य मानले जाते. ह्या विषयावर काही वर्षांपूर्वी उत्तम मराठी पुस्तक वाचनात आले.त्याची माहिती देतो. प्रस्तुत पुस्तकात ह्या विषयावर इतर देशात किंवा संस्कृती मध्ये कसे पाहिले जाते हे सांगितले आहे. एक शापाची जन्मकथा - अरुणा देशपांडे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5727943419433070818?BookName=Eka-Shapa-Chi-Janmakatha
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीश्री भिडे आपला उपक्रम खूपच स्तुत्य आहे असेच जुने लेख पाठवत राहा
दिपा जोरकर
7 वर्षांपूर्वी१५० वर्षाँनंतर हि रजस्वला स्त्रियांकडे बघण्याचा द्दष्टिकोन फारसा चांगला नाही .आता पुन्हा चळवळ सुरु होतेय तिला यश लाभो आणि या दिवसांकडे बघण्याचा समाजाचा द्दष्टिकोन बदलावा हिच अपेक्षा.
prasadkanegaonkar
7 वर्षांपूर्वीKnowledgeable
Dravimagare
7 वर्षांपूर्वीअशाच विचारावर महर्षी धोंडो कर्वे यांनी बरेच लेख लिहिले आहे त्यातील काही लेख प्रसिद्ध करावे
किरण भिडे
7 वर्षांपूर्वी' विविध ज्ञानविस्तार ' अंकातील या लेखावर लेखकाचे नाव लिहिलेले नव्हते. त्यामुळे नाईलाजाने आपण ' अज्ञात ' अशीच नोंद केली आहे.
Janhavi B
7 वर्षांपूर्वीया धाडसी लेखकांचं नाव काय आहे?
smita mirji
7 वर्षांपूर्वीkhupach dhadsache kam kele tyanni salute aahe tyanna
सुजाता पाटील
7 वर्षांपूर्वी१५० वर्षांपूर्वी या विषयावर एवढ्या मोकळेपणाने सविस्तर लिहिणे हे धाडसाचेच काम असणार.