अंक - महाराष्ट्र साहित्य पत्रिका क्र ३१५ ऑक्टो-नोव्हें-डिसेंबर २००५
‘‘शेतकरी कुटुंबात जन्मलो, मातीत राबलो म्हणूनच मातीतल्या माणसांची सुखदु:खे मांडू शकलो. या काळ्या मातीनेच मला लेखक बनवले व गौरवले. शेतकर्यांच्या जीवनाला ‘बारोमास’ वेढून असणार्या, जन्मजात वेदनेच्या हुंकारातून जन्माला आलेल्या या कादंबरीचे प्रेरणास्थान माझ्या सभोवतीचा ओलासुका ग्रामीण परिसर हाच आहे. लेखकाने आपल्या निष्ठा आणि अनुभव यांच्याशी प्रामाणिक राहून लेखन करावे या माझ्यावरील वाङ्मयीन संस्कारांचे फलित म्हणजे ‘बारोमास’ ही कादंबरी आहे.’’ लेखक सदानंद देशमुख यांचे हे विचार ‘बारोमास’ वाचताना अगदी यथार्थ वाटतात. ‘लचांड’, ‘उठावण’, ‘महालूट’ यांसारखे कथासंग्रह व ‘महान’ ही कादंबरी लिहिणारे सदानंद देशमुख, बुलढाणा जिल्ह्यातील, मेहेकर तालुक्यातील, जानेफळ येथील महाविद्यालयात अध्यापक आहेत. मराठीत एम.ए. केल्यानंतर त्यांनी सुमारे 1978च्या सुमारास लेखनाला प्रारंभ केला. धगधगते ग्रामीण जीवन वाचकांसमोर उभे करणारे ते नव्या दमाचे कादंबरीकार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या धोरणामुळे खेड्यांची अवस्था दयनीय झाली होती. स्वातंत्र्य मिळाले. म. गांधींनी मंत्र दिला-खेड्याकडे चला. भारत हा कृषिप्रधान देश असून 80 टक्के खेड्यांचा देश. पण आज स्वातंत्र्य मिळून 55 वर्षे झाली तरी खेड्यांची अवस्था काय आहे?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
पुस्तक रसास्वाद
, महाराष्ट्र साहित्य पत्रिका २००५
, साहित्य रसास्वाद
drvyankatesh
7 वर्षांपूर्वीबारोमास बद्दल खूप ऐकलं होत फार पोटतिडिकेन लिहल आहे आवडल
RaviTorne
7 वर्षांपूर्वीdhanyawad punaha ekada sadar pustak vachlyasarkhe vatale.