विधवा-विवाह कराल तर वाळीत पडाल !

पुनश्च    संकलन    2018-03-21 06:16:14   

अंकनवनीत – मे १९६९ – मराठी डायजेस्ट

मुंबईनजीक विले-पार्ल्याला राहणाऱ्या जाधव या नावाच्या एका ‘मराठा’ तरुणाने, काही महिन्यांपूर्वी ‘कुणबी’ ज्ञातीतील एका बालविधवेशी लग्न केले. या तरुणाचे दिवंगत वडील कोकणामध्ये एक मोठे संत म्हणून मानले जात असत. या तरुणाने एका बालविधवेशी लग्न करून नि तेही आंतरजातीय लग्न करून हिंदू समाजाच्या एकीकरणाचे एक फार मोठे असे पाऊल टाकले, यासाठी त्याचा मोठा गौरव झाला असेल असे कोणाला वाटले तर ते चुकीचे आहे. त्याने अशा तऱ्हेचे लग्न केले म्हणून त्याच्या गावाने त्याला वाळीत टाकले. गावाने त्याला दाखवलेला हिसका इतका जबरदस्त होता की, त्या तरुणाचे निकटचे नातलगही त्याच्या लग्नाला यायला धजले नाहीत.

बहुजन समाजाचा दोष या प्रकरणाने अनेक दुःखकर गोष्टी पुन्हा एकदा ढळढळीत विद्रूप स्वरूपात स्पष्ट करून दाखवल्या आहेत. विसावे शतक उलटत येऊ लागले असले तरी, ‘हिंदू समाज तेवढा एक’ ही सावरकर-हेडगेवार यांची कल्पना अजूनही प्रत्यक्ष व्यवहारात हिंदूंना स्पर्शसुद्धा करू शकलेली नाही. महात्मा फुल्यांचा तोंडदेखला गौरव होत असला तरी, त्यांनी पुरस्कारलेली सामाजिक समता अंतःकरणापासून कोणालाही पटलेली नाही. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , ग्रंथकीटक , नवनीत

प्रतिक्रिया

 1. Hemant Marathe

    2 महिन्यांपूर्वी

  विष्णु शास्त्री पंडित यांच्या धैर्याबद्दल खरच मनापासून कौतुक करायलाच हवे.

 2. Sukruta

    4 वर्षांपूर्वी

  ह्मा घटनेला १५० वर्ष होत आली तरी अजूनही प्रथा, परंपरा, जाती, धर्म आणि लिंग यांचा समाजमानसावरचा पगडा कायम आहे. अजूनही एखाद्याची श्रेष्ठता त्याच्या विचारांवरून ठरता तो कोणत्या जातीचा आहे यावरून ठरते हे दुर्दैवीच नाही का? अजूनही "मुलगा झाला" अशी बातमी देताना विजयी मुद्रा असते, अजूनही "मुलाकडची बाजू" जड असते, अजूनही फक्त ब्राह्मण श्रेष्ठ असतात. अजूनही आपल्या डोळ्यांवरची झापडं बाजूला सारायला आपण तयार नाही. रानडे, पंडीत, कर्वे यांचे विचार समजून न घेता केवळ त्यांची जात कोणती हे पाहून आपण धन्यता मानायची का? शिवाजी आपल्या जातीत जन्मला ना मग आपण सगळे श्रेष्ठ... असा शिवाजी आपल्या घरी मात्र नको ही वृत्ती सर्वच समाजामध्ये अजूनही आहे. विधवा विवाह किंवा इतर सामाजिक सुधारणा ह्या पुढारलेल्या समाजाकडून होणेच गरजेचे आहे. जो समाज आधीच मागास आहे, दुर्बल आहे, चिरडला जात आहे किंवा त्यांना सामाजात मान नाही ते कसा आपला लढा देणार? तेव्हा आपल्यासारख्या सुशिक्षीत, संवेदनशील आणि विचारी लोकांनी ठरवलं तरच काही बदल शक्य आहे. आता फक्त तीन नाही तर अनेक रानडे, पंडीत, कर्वे, फुले हवे आहेत! तरच जाती, धर्म, लिंग, बुद्धी आणि पैसा यावरून श्रेष्ठ/कनिष्ठ असे भेद संपतील आणि माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याची सर्वांना समान संधी मिळेल.

 3. vivek

    4 वर्षांपूर्वी

  adhunikata aani apala samaj yachi sangad ghalit astana tatkalin paristhitiche varnan yat kelele adhalate. andhasradha ani vidyan yat manushya ani manusaki yacha sangharsha disun yeto .veer savarkar yanchi athvan tasech mumbai vidyapeeth( 1857) chi avashakyata adhorekhit hote.

 4. mugdhabhide

    4 वर्षांपूर्वी

  sampurna samajachya virodhat ubhe rahanyachya himatichi dad dyawi tevhadi thodich aahe. bramhan samajala kayam target karanaryanparyant ha lekh pochayala hava.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen