शब्द :- एक लघुकथा


लेखकाने शब्द लिहिला. अर्थातच कागदावर नव्हे, तर त्याच्या लॅपटॉपच्या पडद्यावर. आता त्याला लिहिताना खूप आराम होता. लिहिलेले कागद उडून जाऊ नयेत म्हणून त्यावर वजन ठेवायचा प्रश्न नव्हता आणि पंख्याखाली बसून लिहिता येत होते. लिहिण्याचा मूड असताना आणि प्रतिभेची कृपा आपल्यावर होते आहे, असे वाटल्या क्षणी लिहिण्याचे कागद संपले आहेत, असा प्रसंग आता येत नव्हता. अनंत काळ पुरेल एवढा कागद त्याच्या लॅपटॉप मध्ये होता. वाक्य अर्धवट असतानाच पेन खराब झाले, अथवा शाई संपली अथवा निब फडकली असे होत नव्हते. तर, लेखकाने शब्द लिहिला, वाक्य पूर्ण करण्यासाठी त्याने त्या शब्दाच्या पुढे क्रियापद लिहिले आणि पूर्णविराम देण्यासाठी बोट उचलले तर तो आधीचा शब्द गायब झाला होता. कोणती कळ दाबली आपण कुणास ठावूक. लिहायचं आणि सेव्ह करायचं तेवढ कळतं आपल्याला. ही बाकीची बटणं कशाकशाची असतात, काय माहिती. चुकून काहीतरी दाबलं गेलं असेल एवढं नक्की…. त्याने परत कर्सर त्या क्रियापदाच्या अलिकडे आणला आणि पुन्हा तो शब्द लिहिला. पुन्हा त्याचे बोट पूर्णविरामाकडे गेले आणि पुन्हा तो शब्द उडाला! काय झालं या की-बोर्डला? बिघडला की काय परत? त्या शब्दात असलेले एक एक अक्षर त्याने स्वतंत्रपणे दाबले. सर्व अक्षरे पडद्यावर उमटली. चला, सर्व अक्षरांची बटणे तर काम करत आहेत. मग त्याने उकार, वेलांटी, काना, मात्रा सगळे एकेक दाबून पाहिले. सगळी यंत्रणा आखून दिल्याप्रमाणे काम करत होती. हे सगळे करत असताना, लेखकाने मोठ्या कष्टाने आपल्या प्रतिभेचा प्रवाह आवरून धरला होता.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , ललित
कथा

प्रतिक्रिया

  1. Shrikant Bacchuwar

      4 वर्षांपूर्वी

    खूप आवडली ही कथा. तुमची कल्पना शक्ती अफाट आहे. तुमच्या कडून आता गूढकथा यायला हव्यात.

  2. Bhagyashree Chalke

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर कथा. खरंय, भाषेची दुरावस्था अगदी अचूक उमटली आहे.

  3. Bhagyashree Chalke

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर कथा. खरंय, भाषेची दुरावस्था अगदी अचूक उमटली आहे.

  4. Suresh Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    शब्द कुल्फीचीकाडी असतात .कुल्फी खाल्ली की फेकून देतात .लेखकालाही तेच करावं लागलं.

  5. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर कथा खूप दिवसांनी वाचनामध्ये आली . फॅन्टसीच्या अंगाने जाणारी ही कथा शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारी अशीच होती मराठी भाषा त्यातील शब्द आपण जर वारंवार वापरले नाही तर खरोखरच भाषेचे मरण अटळ आहे . आणि म्हणून आपल्या बोलण्यातून आपल्या लिहिण्यातून आपण वैविध्यपूर्ण अशी भाषा बोललो पाहिजे . इतकी सुंदर आणि प्रवाही गोष्ट ब र्‍याच दिवसांनी वाचण्याचा आनंद मिळाला .

  6. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    वाह.. वेगळा कथाविषय .. कालसुसंगत....

  7. Sadhana_gore

      5 वर्षांपूर्वी

    फार सुंदर गुंफण आहे. खूप आवडली.

  8. Sunanda

      5 वर्षांपूर्वी

    छान झाले आहे.

  9. Meenalogale

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख.लेखाची मांडणी उत्कंठापूर्ण झाली आहे.

  10. Rdesai

      6 वर्षांपूर्वी

    बोलींचा वापर वाढला पाहिजे .भाषा जिवंत राहण्यासाठी जास्तीतजास्त बोली वापरल्या पाहिजेत

  11. नरेंद्र

      6 वर्षांपूर्वी

    जीवन व्यवहार बहुरंगी झाला की त्याच्या अभिव्यक्ती साठी शब्द आपोआप घडू पाहतात. आपण त्यांंचा जन्म सुलभतेने होऊ दिला पाहिजे.

  12. Sunil Agharkar

      7 वर्षांपूर्वी

    मनावर काळीज आली.

  13. JayaKoshatwar

      7 वर्षांपूर्वी

    Mast lekha Uttam

  14. Siddheshwar

      7 वर्षांपूर्वी

    खूप अप्रतिम लेख आहे,महापौर ,अभियंता असे शब्द देणाऱ्या वीर सावरकर यांची आठवण झाली....बोलीभाषेच्या नावाखाली आपण भाषेचे सत्व हरवत चाललो आहोत

  15. Sunila

      7 वर्षांपूर्वी

    अदभुत रम्य पण आशयघन लेख Clear in message आपण ही जास्तीत जास्त शब्द वापरले पाहिजेत ्

  16. vijaybapat

      7 वर्षांपूर्वी

    छान,उपक्रम चांगला आहे. जुन साहित्य भरपूर वाचायला मिळेल.याचा आनंद होतो.

  17. anantpalav

      7 वर्षांपूर्वी

    मन खिन्न झाल. सुंदर कथा / धन्यवाद .

  18. Shyam

      7 वर्षांपूर्वी

    शब्द कसे हरवत आहेत ते महेश एलकुंचवार यानी छान सांगितले आहे . वॉशिंग मशिन आले आणि आपटणे धोपटणे खळबळणे khangaaLAD

  19. Vivek

      7 वर्षांपूर्वी

    सुन्न झालो सत्य एकदम कटू वास्तव

  20. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख!??

  21. Anjali Joshi

      7 वर्षांपूर्वी

    लेख खूप आवडला.पण शेवट सकारात्मक हवा होता.एवढ्या सजगतेने लिहिले ला लेख निराशा पेरतोय.

  22. Aaidada

      7 वर्षांपूर्वी

    मला लेख आवडला हे नक्कीच. सध्याच्या काळातील तंत्रज्ञान, भाषे बाबतची उदासिनता हे समर्पक शब्दात मांडले आहे फक्त संपताना एक रुखरुख वाटली की जर एवढे प्रयत्न केले होते तरीही तो शब्द छापताना वगळला जाणे हे नकारात्मक वाटले. लेखाचा उद्देश सकारात्मकते कडे जाणाराच हवा होता.

  23. adityalele55

      7 वर्षांपूर्वी

    Hats Off Tambi Durai !! khupach sunder !! agdi kaaljala haat ghalnara lekh aaj marathi bhasha dinanimitta !!!

  24. Shripatil

      7 वर्षांपूर्वी

    ज्या मायबोलीला गुरुमाऊली ज्ञानेश्वरांनी ही अमृताचे पैजा जिंकेल ह्या शब्दात उचित गौरव केला त्या मायमाऊलीला वाचविण्याची शिवप्रतिज्ञा करावी आणि आता अभिप्राय पाठवत असताना लेखकांचा शद्ब हरवला तसा माझ्या दूरध्वनी यंत्रातून हरवायला नको म्हणून मी प्रयन्तशील राहीन. लेख आवडला लेखकांचे मनःपुर्वक आभार व अभिनंदन....???

  25. श्रीकांत गोविंदराव पाटील

      7 वर्षांपूर्वी

    ज्या मायबोलीला गुरुमाऊली ज्ञानेश्वरांनी ही अमृताचे पैजा जिंकेल ह्या शब्दात उचित गौरव केला त्या मायमाऊलीला वाचविण्याची शिवप्रतिज्ञा करावी आणि आता अभिप्राय पाठवत असताना लेखकांचा शद्ब हरवला तसा माझ्या दूरध्वनी यंत्रातून हरवायला नको म्हणून मी प्रयन्तशील राहीन. लेख आवडला लेखकांचे मनःपुर्वक आभार व अभिनंदन....???



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen