तिची माझी ओळख तशी फार जुनी नाही. चांगली जाणती होईपर्यंत ती आपली “आई” होती, आणि जरी इतर चार आयांपेक्षा ती अगदीच निराळी होती ही जाणीव असे. तरी इरू म्हणजे काय याचा सुगावा आत्ता कुठे थोडा थोडा लागू लागला होता. तिचे खरे वेगळेपण जरी लहानपणी समजले नाही तरी त्याची बाह्यदर्शने वरवर बघणाऱ्यालाही सहज उमजावीत अशी-आम्ही तिला ‘इरू’ म्हणणे, तिचे एवढे थोराड असणे, तिने रोज उठून कामावर व वर्षातून दोनदा उठून जगभर जाणे, तिने लठ्ठ व विचित्र भाषांतल्या पुस्तकांत गुंतून जाणे, तिला दागिने नसणे, (एका सापाने आपलीच शेपूट तोंडात धरली आहे अशा तिच्या बांगड्या तिने माझ्या लग्नात मोडून मला चार बांगड्या केल्या आणि मग सवाष्ण म्हणून घालायला अंगावर सोनं फक्त मंगळसूत्र उरलं होतं. परवा-त्यालाही मध्ये वाट्या नसून एक मोठा तपकिरी खडा होता. त्याला ती “दिनूचा डोळा” म्हणायची!), तिने कुंकू न लावणे, तिने स्कूटर चालवणे, वगैरे वगैरे. आणि या सर्वापेक्षा फारच म्हणजे तिचा हट्टी, आग्रही आणि मानी स्वभाव. जनरल आया ह्या फार गोड स्वभावाच्या, मुलांना “माया लावणाऱ्या” मुलांची बाजू वडिलांना (जे बहुतेक रागीट असतात!) समजावून सांगणाऱ्या, वगैरे असतात. माझी आई बहुतेक करून चांगली चिडकी होती. प्रत्येक गोष्टीत वाद घालायची तिला हौस. तेव्हा मुले विरुद्ध ती आणि कोर्ट ऑफ अपील म्हणजे दिनू, हे रिंगण आम्ही दर आठवड्यातून दोन-तिनदा तरी घालत असू,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीउत्तम लेख
Jayashree Gokhale
4 वर्षांपूर्वीगौरी देशपांडे यांनाच शोभणारे लेखन.तिरकस सकस सहज आणि आई बद्दल चे प्रेमाचे खास खास ठेवणीतले वर्णन. एकंदर झकास.
aparna Vichore Athalye
4 वर्षांपूर्वीविद्वान आईला तितक्याचहुशार मुलीची भावाजली.
sunitapathade
6 वर्षांपूर्वीकिती सुरेख लेख.दोघी खूपच आवडत्या.
Sheetal
7 वर्षांपूर्वीकसलं सुंदर, धन्यवाद वर्षा ?
rajashreejoshi
7 वर्षांपूर्वीआवडला
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीसुबोध जी, तो लेख वाटतोय खरा अपूर्ण. पण आम्हाला जेव्हढा मिळाला तेव्हढा आपण टाईप करून घेतलाय.
सुबोध केंभावी
7 वर्षांपूर्वीगौरीच्या नजरेतून जणवणाऱ्या इरावतीबाई असा हा लेख खास आहेच. इरू ही गौरीच्या कथेतील व्यक्तीरेखाच वाटते. >>एक मात्र राहील. ज्ञानेश्वर, चैतन्य, एकनाथ, ...जाणून घ्यायचं राहीलं.<< हा परिच्छेद ह्याच लेखातला आहे का? तो पूर्ण टाईप नाही झालाय का?
Chitra Rajendra Joshi
7 वर्षांपूर्वीमाफ करा. माझा काहीतरी गैरसमज झाला. सत्यकथेतील लेख समजले मी हा! तरीपण... आईविषयी इतकंच कसं असं आलं मनात!!!!
Chitra Rajendra Joshi
7 वर्षांपूर्वीलेख अर्धवट आहे....
जया
7 वर्षांपूर्वीउत्तम .