आचार्य अत्रे यांनी दत्तू बांदेकर यांचा उल्लेख 'कारुण्याचा विनोदी शाहीर' असा केला होता. साध्या साध्या गोष्टींमधून विनोद फुलविण्याची बांदेकरांची शैली एवढी अफाट होती की अत्र्यांनाही त्यांचा हेवा वाटत असे. अत्र्यांच्या 'नवयुग'च्या पहिल्या पानावर सतत २० वर्षे बांदेकरांची हजेरी होती, यावरुन बांदेकरांचे मोठेपण लक्षात यावे. अनंत काणेकर आणि मो. ग. रांगणेकर यांनी सुरू केलेल्या 'चित्रा' या साप्ताहिकात दत्तू बांदेकर यांनी प्रथम 'तो आणि ती' हे सदर सुरु केले आणि त्यातच त्यांना विनोदाची सूर सापडला. पुढे त्यांनी नवयुगमध्ये 'सख्याहरी' या नावाने सदर सुरु केले. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात त्यांच्या लिखाणाला राजकीय धार आली. बांदेकरांचा विनोद आणि त्यांची शैली यांचा परिचय करून देणारा हा मृत्युलेख - अंक – श्री दीपलक्ष्मी; वर्ष - दिवाळी १९५९ दत्तु बांदेकरांनी गेली तीस वर्षे आपल्या सिद्धहस्त लेखणीने खोचक नि खवचट लेखन करून समाजातल्या विषारी विषमतेची, राजकारणांतल्या राक्षसी दंभाची आणि साहित्यातल्या झब्बूशाहीची पुरेपूर भंबेरी उडवली. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष कृतांत काळाची देखील ज्याने पदोपदी थट्टा केली ते दत्तु बांदेकर रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी अकस्मात कालवश झाले.‘सोनापूर’ या ‘क्षेत्राची’ कटु विटंबना आणि मृत्यूची मस्करी बांदेकरांइतकी कुणी लेखकाने केली नसेल ! ‘दीपलक्ष्मी’च्या ऑक्टोबरच्या अंकात ‘जरा सरकून घ्या !’ ह्या त्यांच्या लेखांत देखील त्यांनी मृत्यूविषयी लिहिले आहे. आपल्या आधी स्वर्गात गेलेल्या मृताम्यांना त्यांनी मोठ्या कळवळ्याने ‘जरा सरकून घ्या’ म्हणून आवाहन केले आहे. जणू काय, आपण आता लवकरच त्यांच्याकडे जाणार आहोत असे त्यांना कळले असावे. ‘दीपलक्ष्मी’तला ह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sureshjohari
7 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर लेख
bookworm
7 वर्षांपूर्वीदत्तू बांदेकर आमच्या काही पिढ्या अगोदरचे! पण हे वाचून आपण जरा अगोदर जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटलं! हृद्य लेख!
Khushal
7 वर्षांपूर्वीमी सशुल्क सभासद असूनही मला हा व इतर लेख वाचायला मिळत नाहीये , कृपया कळावे . ई-मेल :[email protected]
mangeshnabar
7 वर्षांपूर्वीदत्तू बांदेकरांवरील लेख आणि तो मनोहर बोर्डेकर यांनी लिहिलेला, १९५९ मधील दीपलक्षमीच्या अंकातला... हे पाहून हा लेख आमच्यासारख्याना वाचावा असे वाटले नाही तरच नवल ! तरीही खुद्द मो. ग. रांगणेकर यांनी लिहिलेला एक लेख आहे. त्यात असेच बांदेकरांचे अलौकिक टॅलेंट वर्णन केले आहे. असो, आपण हा आजोबांच्या पेटीत तळाशी असलेला मेवा देत आहात एवढे म्हटले तरी दाद दिल्याजोगे व्हावे. मंगेश नाबर
aghaisas
7 वर्षांपूर्वीछान आहे लेख. बांदेकरांचे लेखन वाचायला मिळाले तर बहार येईल