असे म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौध्दिकानंतर एका कार्यकर्त्याने गोळवलकरांना संघाच्या विचारसरणीत काही बदल सुचवले होते. त्यावर गुरूजी म्हणाले, 'बदलला की संघ संपला हे लक्षात ठेव'. कम्युनिस्ट पक्षालाही हे वर्णन तंतोतंत लागू होते. मिखाइल गोर्बाचेव यांनी ११ मार्च १९८५ रोजी रशियाच्या पॉलिटब्युरोचे महासचिव म्हणून सूत्रे हाती घेतली आणि २५ डिसेंबर १९९१ रोजी राजीनामा देऊन रशियाची सूत्रे बोरिस येल्तसिन यांच्या हाती सोपवली. आपल्या कारकिर्दीच्या सहा वर्षात गोर्बाचेव यांनी पक्षाची पारंपरिक ताठर भूमिका सोडून देऊन ग्लासनोस्त (खुली चर्चा) व पेरेस्त्रॉइका (पुनर्रचना) यांची मात्रा दिली आणि जनतेत असलेला अनेक वर्षाचा असंतोष उफाळून आला. परिणामस्वरूप २६ डिसेंबर १९९१ रोजी रशियाचे विघटन होऊन प्रजासत्ताकातील छोट्या छोट्या राष्ट्रांना स्वातंत्र्य देण्यात आले. या गोष्टीला आता सव्वीस वर्षे झाल्यावरही रशियाची ताकद आणि ताठा टिकून आहे. पण या सर्व घडामोडी घडत असताना त्यांचा काय अर्थ काढला जात होता, त्याकडे पाहण्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा दृष्टीकोन कसा होता, याचे विवेचन करणारा एक दीर्घ लेख १९८८ साली मौजेत प्रसिध्द झाला होता. जुने विचारवंत आणि एकेकाळी स्वतः कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असलेले श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी हा लेख लिहिल्याने त्याचे महत्व अधिक आहे. १ मे कामगार दिनाच्या निमित्ताने, कामगारांच्या कल्याणाचा वसा घेऊन स्थापन झालेल्या सोविएत रशियाच्या विघटनाचा पाया कसा घातला गेला ? त्याची पार्श्वभूमी काय होती ? याचा उहापोह करणारा पहिला भाग आज वाचा. ******** अंक- मौज; वर्ष- १९८८ अलीकडे सोविएत युनियनने सेऊल ऑलिम्पिक्समध्ये १३२ पदके मिळविण्याचा विक्र
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .