पहिल्या भागात आपण वाचलं की पाश्चात्य भांडवलशाही देशांशी तुलना केल्यास, सोविएत युनियन, चीन, पूर्व जर्मनी, विएतनाम, क्युबा ही कम्युनिस्ट राजवट असलेली राष्ट्रे मागे पडली होती. त्याचप्रमाणे कम्युनिझम राबवणारी चीन आणि रशिया ही बलाढ्य राष्ट्रे एकमेकांच्या विरोधात उभी होती. पैकी चीनने तर चक्क भांडवलशाहीवादी अमेरिकेचा गोट जवळ केला होता. आणि एकंदर कम्युनिस्ट राष्ट्रांची आर्थिक प्रगती खुंटल्यासारखी झाली. आता पुढे => अंक- मौज; वर्ष- १९८८ १९८२ साली ब्रेझनेवचे निधन झाले, त्या वेळी ही अशी परिस्थिती होती. त्यानंतर आंद्रेपोव व चेर्नेको या दोन वृद्ध नेत्यांची प्रत्येकी जेमतेम दीड वर्षांची कारकीर्द त्यांच्या मृत्यूने समाप्त झाली. त्या तीन वर्षांतही कम्युनिस्ट जगाची परिस्थिती सुधारली नाही. उलट आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील त्या गटाचा तणाव व शस्त्रास्त्रस्पर्धा वाढतच राहिली. अशा या पार्श्वभूमीवर १९८५ साली मिखाइल गोर्बाचेव यांनी सोविएत नेतृत्वातील सत्तास्पर्धेत बाजी मारून पार्टीचे सरचिटणीसपद काबीज केले. त्या वेळी ते ५४ वर्षांचे होते. म्हणजे स्तालिनने १९२३-२४ मध्ये सर्वोच्चपद हाती घेतले, त्यानंतर साठबासष्ट वर्षांनी प्रथमच सोविएत युनियनला तुलनात्मक दृष्ट्या तरुण व तडफदार नेतृत्व लाभले. त्याचे परिणामही लवकरच दिसून आले. तसे पाहिले तर गोर्बाचेव यांनी ब्रेझनेवच्या कारकीर्दीत किंवा आंदेरपोव व चेर्नेको यांच्या राजवटीत निदान उघडपणे तरी त्या राजवटींविरुद्ध संघर्ष केलेला नव्हता किंवा पुढे त्यांनी ज्या गैरप्रकारांविरुद्ध व अपप्रवृत्तींविरुद्ध संघर्ष सुरू केला तशी काही बंडखोरी ते सत्तेवर येईपर्यंत त्यांनी केलेली नव्हती. परंतु मार्च १९८५ मध्ये पार्टीचे स ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
किरण जोशी
7 वर्षांपूर्वीग्लासनोस्त व पेरीस्त्रोयका मुळे भारत व जगावर नक्की काय बदल/परिणाम झाले हे जाणून घ्यायला आवडेल.