आधुनिक महाराष्ट्राचे आद्याचार्य व राष्ट्रगुरु (उत्तरार्ध)

पुनश्च    प. म. लिमये    2018-05-12 06:00:16   

शिक्षकपेशातील कार्यानंतर अर्थातच बाळशास्त्र्यांचे इतिहासाने सुवर्णाक्षरात नोंदलेले कार्य आहे ते 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे. हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये होते. त्याची निर्मिती, कार्य, कार्यकारणभाव  स्वतः बाळशास्त्र्यांनीच स्पष्ट केला होता. त्यांनी केवळ सहा वर्षाच्या अभ्यासात आत्मसात केलेले इंग्रजी भाषेचे ज्ञान इंग्रजी व्यक्तिंनाही थक्क करणारे होते. बाळशास्त्र्यांवरील लेखाच्या या उत्तरार्धात 'दर्पण' विषयी आणि  बाळशास्त्र्यांच्या मूल्यमापनाविषयी- ******** अंक- चित्रमयजगत्; वर्ष- नोव्हेंबर १९५३ येथपर्यंत बाळशास्त्र्यांच्या शिक्षकपेशातील कार्याचा परामर्श घेतला. आता त्यांनी विस्तृत अर्थाने शिक्षणाचे म्हणजे वर्तमानपत्राद्वारा लोकशिक्षणाचे जे कार्य केले त्याकडे वळू. ता. ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी-मराठी वर्तमानपत्राचा पहिला अंक निघाला. साडेआठ वर्षे चालल्यावर ते बंद पडले. बाळशास्त्री प्रथमपासून त्याचे संपादक होते, आणि ते मुख्यत: इंग्रजी भाग सांभाळीत. देशी वर्तमानपत्र हे त्या काळात पैसा मिळविण्याचे साधन होणे शक्यच नव्हते; उलट, पदराला खार लागण्याचीच खात्री! सार्वजनिक कामाची हौस व आस्था यांतून ‘दर्पण’ चा जन्म झाला. केवळ वीस वर्षे वयाच्या बाळशास्त्र्यांनी हे साप्ताहिक संपादन करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घ्यावी, ही त्यांच्या लोकहितेषितेला मोठी भूषणावह गोष्ट होती. तसे पाहिले तर कोकणातून आलेल्या व गरिबीच्या अडीअडचणींतून विद्याभ्यास पार पाडल्याबरोबर सरकारी नोकरीस लागलेल्या युवकाला ही जबाबदारी अंगावर ओढून घेऊन सुखाचा जीव नसत्या यातायातीत

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , समाजकारण , चित्रमयजगत् , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

 1. MADHAVIMD

    3 वर्षांपूर्वी

  दर्पण ने पर्यायाने जांभेकरांनी केलेले कार्य अतुलनीय च.

 2. prakash.joshi

    5 वर्षांपूर्वी

  Revelation. Appreciate that even against all odds a Marathee gentleman achieving such a feat.

 3. kiranshelke

    5 वर्षांपूर्वी

  chaturastra vyaktimatwa.

 4. kiranjoshi

    5 वर्षांपूर्वी

  बाळशास्त्री जांभेकरांना तत्कालीन स्पर्धेचा फटका बसला? ते युगप्रवर्तक होते यात शंकाच नाही.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen