संपूर्ण भिजलेलं असं कुत्र तुम्ही पाहिले आहे का? स्वत:चं अंग फडफडून तुषारांची चौफेर उधळण करून ते पाहता पाहता नखशिखांत कोरडे होते! याच कारणामुळं विमान-तंत्रज्ञांना कुत्र्याचा हेवा वाटत असे. विमान-तंत्रज्ञांना आंघोळ केल्यावर टॉवेल वापरण्याचा कंटाळा आला होता म्हणून त्यांना कुत्र्याचा हेवा वाटत होता असं मात्र नाही. त्यांची समस्या वेगळीच होती. ‘बर्फा’ची नव्हे मृत्यूची मगरमिठी! अलीकडे जेट विमान फार उंचावरून जवळ जवळ १२-१३ किलोमीटर्स उंचीवरून उडतात ही गोष्ट सर्वांना ठाऊकच आहे. तेथे हवा एवढी थंड असते की. विमानाच्या पंखावर बर्फाचे थरच्या थर जमू लागतात. त्यामुळे विमानावर निरूपयोगी बर्फाचा टनावारी भार पडतो. (विमानात निरुपयोगी वजन थोडे जरी वाढले तरी इंधन खर्च भराभर वाढत जातो.) हा एक तर तोटा होतोच पण विमानाच्या पंखांचा व शेपटीचा गणिताने निश्चित केलेला आकारही बेडौल होऊन जातो व त्यामुळे हवेच्या लाटांवर पेललेल्या विमानाची उद्धरण शक्ती झपाट्याने कमी होते. जर हा बर्फ दूर करण्याचा मार्ग शोधता आला नाही तर विमानाला आपले उड्डाण ५-७ मिनिटातच आटोपते घ्यावे लागते. शीतप्रदेशात हिवाळ्यात तर ही समस्या अतिशयच कठीण होते. विविध मार्ग यावर अनेक उपाय करण्यात आले. पण ते एकतर पुरेसे परिणामकारक नव्हते किंवा खर्चिक होते. उदाहरणार्थ विमानावरून गरम हवा खेळवण्याची पद्धत किंवा विमानाच्या शरीरात विद्युतप्रवाह खेळविण्याची पद्धत. ही पद्धत अतिशय खर्चिक आहे त्यामुळे दर चौरस मीटर क्षेत्रफळावर ताशी १५-२० युनिट वीज खर्च होते. म्हणजे विमानाची १०-२० टक्के शक्ती यावरच खर्च होई. पाण्याने (अर्थात बर्फानेही) न भिजू शकणारा पापुद्रा किंवा द्रवतरंग विमानावर चढविण्याचे प्रयत्नही निष्फळच ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
MADHAVIMD
5 वर्षांपूर्वीनविन माहिती मिळाली
shailesh71
7 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण !
bookworm
7 वर्षांपूर्वीविलक्षण! अलौकिक प्रतिभा!
अनिरुद्ध
7 वर्षांपूर्वीछान! कुत्र्याचे उदाहरण चपखल वाटले. बारीक निरिक्षण केले तर मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं निसर्गात आपल्या जवळच आढळतात हे दिसून आलं
ajitpatankar
7 वर्षांपूर्वीवा !! उत्तम माहिती.. या तंत्राला Electro Impulse De-icing System (EIDS) किंवा Pulse Wave De-icing system म्हणतात एवढीच माहिती होती.. त्याची पार्श्वभूमी व शोधकर्त्याचे नाव माहित नव्हते. लेख वाचून छान वाटले.
CHARUDATTA SHRIDHAR SHENDE
7 वर्षांपूर्वीSUPERB !
शरद कांबळे
7 वर्षांपूर्वीअतिशय उदबोधक माहिती धन्यवाद