रंगमंचाच्या मध्यभागी एक कलावंत गणपतीचा मुखवटा लावून आणि एक हात आशीर्वादाच्या मुद्रेत धरून उभा आहे. डावीकडून काळू येतो आणि उजवीकडून बाळू येतो. दोघेही समोर प्रेक्षकांकडे पाहात आहेत त्यामुळे त्यांची टक्कर होते. काळू- (आश्चर्यानं) तू व्हय? मला वाटलं आला आसंल येखादा चॅनेलवाला बाई घ्यायला! बाळू- व्हय. मीच व्हय. आन् तू ह्ये सारखं सारखं बाई काय घिऊन बसला हाईस? ट इसरलास वाटत? काळू- ट? म्हंजी टग्या? आमित श्या? बाळू- आरं काही कंट्रोल हाय का नाय जिभंवरती? कुठलाबी ट कुठंबी लावतूयास. आमित श्या नं हे ऐकलं तं ट म्हंजी टरफलासारखी गत करील की गड्या तुजी. दाने काडून उरलेल्या टरफलासारखी. काळू- आरं मी कसला घाबरतूय त्या श्या आन् फ्या ला! त्याचं कायबी चाललं नाय कर्नाटकमंदी. येका ट ला दुसरा ट भ्येटला की आसंच होतं बग. (गणपतीचा मुखवटा घातलेला कलावंत चुळबूळ करतो आणि लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो..) मुखवटावाला- शूक...शूक... बाळू- आरं शूक शूक काय करतुया? तुला आधी बाई आठवली आन् आता शूक शूक? काळू- शूक शूक? मी कधी केलं? तुज्या कानांचा काय पृथ्वीराज चव्हाण झाला का काय? बाळू- आता हे काय भलतं? कानांचा पृथ्वीराज चव्हाण झाला म्हंजी? काळू- आरं पृथ्वीराज चव्हाण काँग्रेससाठी कसा हाय? तो हाय काय आन् नाय काय. तसे तुझे कान झाले की काय म्हटलं. हाय काय आन् नाय काय.. ( पुन्हा शूक...शूक...आवाज येतो. दोघांचही लक्ष गणपतीकडे जातं) बाळू- आरं देवा, गणपतीला पार इसरलो आपण..(दोन्ही कान धरतो) देवा दोन्ही पृथ्वीराज चव्हाण धरतो आन् तुमची माफी मागतो. काळू- (विंगेत बघून) आरं वाजवा...नमन होऊन जाऊ द्या. (बाळूकडे पाहून) हां, कर सुरू. बाळू- (एक तळहात कानावर आणि एक हवेत उंचावून गातो)- शिव पारोतीच्या नंदना तुज ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
Shandilya
3 वर्षांपूर्वीवा, लई भारी
Nishikant
3 वर्षांपूर्वीच्या मायला ! तंबी ,आरं समदी श्या ला घाबारली का काय? परतीक्रीया बी दिना कुनी.