fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

का नको मराठी शाळा?

आज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही. आणि डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे दूर सारून त्यांना इंग्रजी माध्यम का स्वीकारावेसे वाटते, मराठी शाळा कुठे कमी पडतात, याचा परामर्श घेतलाय शुभदा चौकर यांनी. २००३ साली लिहिलेला त्यांचा हा लेख आजही तितकाच ताजा आणि कालसुसंगत वाटतो –

बहुविध डॉट कॉम वरील पुनश्च विभागातील हा लेख वाचा. चिंतन सदरातील हा लेख अतिशय वाचकप्रिय आहे. पुनश्च विभागात याप्रमाणे इतर 26 सदरात ( अनुभवकथन, चिंतन, रसास्वाद इ. ) जुन्या नियतकालिकातील ( सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर, दीपावली इ.) असेच छान छान लेख असतात.
आजच रुपये २५० भरून पुनश्च चे वार्षिक सभासद व्हा आणि अशाच शेकडो लेखांचा आनंद लुटा.
सभासद होण्यासाठी ९८३३८४८८४९ या क्रमांकावर miss call द्या. आम्ही आपल्याशी संपर्क साधू…

********

आज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही, डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट नाही, ही वस्तुस्थिती आहे. मीही गेल्याच वर्षी या सर्व प्रकियेतून गेले. पूर्ण विचारांती या सार्वत्रिक स्थितीकडे पाठ फिरवून अपवाद केला. मुलीला मराठी शाळेत घालण्याचा हा निर्णय घेताना मनात चाललेली विचारप्रकिया, काही सुज्ञ, विचारी मित्र, शिक्षणतज्ञ इत्यादींशी मुद्दाम केलेल्या चर्चा यातून मराठी शाळांची स्थिती, पालकांचे विचार आणि मुलांच्या भवितव्याविषयीची त्यांची धारणा याबाबत अनेक विचारार्ह मुद्दे समोर आले.

`मातृभाषेतून शिक्षण घेणे तार्किकदृष्ट्या योग्यच’ हे विज्ञानानेही वारंवार सिद्ध केलेले असताना त्याच मुद्द्यावर तडजोड करून अनेक सुजाण पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवताना दिसताहेत. त्याची कारणे आणि त्या कारणांवर आधारित विचारमंथन घडून यावेसे वाटते. 

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 21 Comments

 1. Lekh aavadla. Mulana Marathi tun shikshan denyacha aamcha nirnay yogya vat to mazi donhi mula marathi bhashe tun shikshan ghet aahet

 2. पुर्ण लेख वाचायला मिळत नाही

  1. संतोष जी, आपण इग्यान कि चे सभासदत्व घेतले आहे. तुम्हाला जो लेख वाचायचा आहे तो अवांतर या नियतकालिकातील आहे. तुम्ही login असाल तर सभासद विभागातून अवांतर चे सभासदत्व घेता येईल. ते निःशुल्क आहे.

 3. सुंदर व वास्तव लेख

 4. शाळेतील शिक्षक आणि परिस्थितीचे अचूक वर्णन..

 5. छान. मला वाटते लोक जाणीवपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळांना कमी लेखतात.
  शासकीय, महापालिकेच्या शाळांची मुद्दाम वाट लावली जात आहे.

 6. आज शुभदा चौकर यांचा लेख वाचला. थोडा उशीराच वाचला पण प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवत नाही म्हणून ……
  मी माझी दोन्ही मुले इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घातली. त्यावेळी ती अनुक्रमे ४ थी व १ ली मध्ये होती. मोठ्या मुलाला इंग्रजी माध्यमातूनच ४ थीची scholarship देखील मिळाली होती . थोडक्यात मुले शालेय शिक्षणात कुठेही मागे पडत नव्हती. तरीही आम्ही हा निर्णय घेतला. आणि त्यावेळी ज्या ज्या नामवंतांचे मातृभाषेतून शिक्षण विषयक विचार वाचले होते त्यात शुभदाजी देखील होत्या.
  शुभदाजींनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर मी व माझ्या यजमानांनी विचार केला होता. मुलांना अभ्यास सोपा असेल तर त्यांचे बालपण छान जपले जाईल, त्यांना खेळाबरोबरच अवांतर वाचन करता येईल व स्वत:ची वैचारिक बैठक असलेला एक प्रगल्भ नागरिक ते बनू शकतील या मुद्द्यांना आम्ही जास्त महत्व दिले.
  मुले शाळेत फारतर ५ तास असतात बाकीचा वेळ आपल्याबरोबरच असतात त्यामुळे शाळेच्या crowd चा व शिक्षकांच्या भाषेचा विचार थोडा बाजूला सारला.
  माझी मुले इंग्रजी माध्यमात जात असताना आमच्या इमारतीत राहणाऱ्या डॉ मोघे यांचा मुलगा मात्र डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेत शिकत होता. आमच्यासमोर तो १० मध्ये गुणवत्ता यादीत तर झळकलाच पण १२ नंतर IIT पवई येथे शिकायला गेला. त्यामुळेही आम्हाला हा निर्णय घेणे सोपे गेले.
  सर्वात महत्वाचे होते माझ्या मोठ्या मुलाचे मत परिवर्तन. एका posh इंग्रजी शाळेतून मराठी माध्यमाच्या aided school मध्ये जाणे हा बदल त्याच्यासाठी मोठा होता. तिथे रुळायला २ वर्षे लागली पण आता त्याला हे मनापासून पटले आहे की त्याचा अभ्यास सोपा झालाय. उगाचच सगळे विषय इंग्रजीतून शिकण्याची गरज नाहीये. आणि येथेच आमचा निर्णय योग्य असल्याची आम्हाला पावती मिळाली आहे.

 7. वडिलांच्या बदलीमुळे आमच्या दोन्ही मुली मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्या. लहान गावात मराठी माध्यमाची चांगली शाळा मिळते, इंग्रजी माध्यमाची मिळतेच असे नाही. धाकटीला पहिलीपासुन इंग्रजी विषय होता. सुदैवाने दोघींनाही पाचवीपासुन सेमी इंग्लिश होते, त्याचा उपयोग झालाच. मोठी M. S. होऊन परदेशात नोकरी करत आहे. धाकटी M. S. करत आहे.
  दोघींचंही मराठी, इंग्लीश वाचन भरपुर आहे.

 8. लेख आणि मांडालेले विचार मुद्दे फार महत्वाचे आहेत.प्रत्येक पालकाने चिंतन करावे.परंतू गरज आणि आवड यांचा मेळ घालावाच लागतो.तसेच पाहता घराबाहेरील जगात पाश्चात्त्य भाषा गरजेची असली तरी घरातील भाषा मातृभाषा असणे तितकेच गरजेचे आहे.

 9. मी हा लेख लिहून आता १५ वर्षे झाली. आजही हा लेख समयोचित आणि उपयुक्त वाटतो, त्यावर चर्चा होते, याचा लेखक म्हणून आनंद आहे. मात्र एक सुजाण नागरिक म्हणून १५ वर्षांत या स्थितीत सुधारणा होऊ नये, याचा विषाद वाटतो. शासन, प्रशासन, पालक सर्वानी तीव्र इच्छाशक्ती दाखवली तर मातृभाषेतून शिक्षणाचा ट्रेंड रुजेल का? त्याचे फायदे मुलांना मिळतील का?
  मी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत, बालवाडीत घातले आणि मगच हा लेख लिहिला. आता ती १८ वर्षांची आहे. UDCT मध्ये Chemical technology चे पहिले वर्ष उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ती मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तके वाचते, इंग्रजी सिनेमे आवडीने बघते. इंग्रजीत किंवा एकंदर विकासात कमी पडलेली नाही. हे एवढ्यासाठी सांगितले, कारण मराठी माध्यमाची हट्टाग्रही पालक असले तरी आई म्हणून काही क्षणी हुरहूर वाटायची की, माझा निर्णय तिला त्रासदायक तर ठरणार नाही? पण प्रत्येक टप्प्यावर पटत जातेय, की तो निर्णय बरोबर होता, सुखाचा होता- तिच्यासाठीही!
  आपण जरूर चर्चा करूया, मार्ग शोधूया. आणि मुलांना आनंदाने, विना-त्रास शिकू देऊ या…
  शुभदा चौकर

Leave a Reply

Close Menu