ग्राहक हमारे लिये भगवान है, असे स्टिकर्स आपल्याकडे बऱ्याच दुकानांमधून लावलेले दिसतात. प्रतिकात्मकता हा आपल्या सामाजिक वर्तनाचा स्थायीभाव असल्याने ग्राहकाला एकदा भगवान म्हटले की त्याला वाट्टेल तसे लुबाडण्यास सगळे मोकळे होतात. नागरिक किंवा मतदार हा सुध्दा एक प्रकारे सरकारचा ग्राहकच आहे आणि पक्ष कुठलाही असो, सरकारची वृत्ती ग्राहकाला भगवान (किंवा मतदार राजा) ठरवून त्याची फसवणूक करण्याचीच असते. या वातावरणात, भारतात ग्राहकांची शासकीय ते खाजगी अशा सर्वच क्षेत्रात कशी सर्वंकश पिळवणूक होत असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीने ग्राहकाच्या हक्कांसाठी चिकाटीने दिलेले लढे आणि मिळवलेले यश हे अपूर्व असे आहे. या यशस्वी चळवळीचा आणि तिच्या स्वरूपाचा हा ओघवता,टोकदार परिचय- ******** भारतात जागतिकीकरणाच्या आगमनाची पंचविशी पूर्ण झाली आहे. एव्हाना आपण खऱ्या अर्थाने ग्लोबन सिटीझन झालो आहोत. देशोदेशींच्या कंपन्यांची उत्पादने वापरत आहोत. शिक्षण, व्यापार, पर्यटन अशा कारणांनी देशाच्या सीमा ओलांडत आहोत. अशा वेळी ग्राहक म्हणून आपल्याला कोणत्याही देशाशी व्यवहार करताना समान न्याय मिळायला हवा. तसे घडण्यात अनेक अडचणी आहेत. प्रत्येक देशातील ग्राहक विषयक नियम, कायदे वेगवेगळे असतात. त्याचा गैरफायदा काही कंपन्या घेतात. उदा. अमेरिकेत रद्दबादल ठरलेले कृत्रिम गुढघे भारतात स्वीकारार्ह असू शकतात आणि त्यामुळे अनेकांच्या शरीरात सदोष गुढघे बसून त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून सर्व देशांनी काही समान संकेत पाळायला हवे. हे संकेत ठरवणाऱ्यापैकी एक महत्त्वाची संस्था म्हणजे `युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स आॅन ट्रेड अँड डेव्हलपमेंट- UNCTAD’. UNCTAD ने जगभरातील ग ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
mandarphadke
7 वर्षांपूर्वीमाझी आई सौ नीता फडके आणि मामा श्री निळूभाऊ दामले हे मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्यांपैकी. माझे वडील डॉ गोविंद फडके ह्यांनी ग्राहक पंचायतीचे कित्येक लढे लढविले. ह्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
SUSHYANAND
7 वर्षांपूर्वीअाम्ही मुंबईला असताना ग्राहक पंचायतीचे सदस्य होतोच अाता पुण्याला अाल्यावर संघ स्थापन करुन सुरवातीला मुंबईहुन सामान येत असे. पण अाता पुण्यातच बरेच संघ झाल्यामुळे इथेच वितरण केंद्र सुरु केले अाहे. काम अतिशय व्यवस्थित असते. अाधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यामुळे सुकर झाले अाहे
Prachij
7 वर्षांपूर्वीपरिचय आवडला. ग्राहक पंचायतीची गेली दहा वर्षे सदस्य आहे. अनुभव खूपच चांगला आहे. त्यांचं कार्यही कौतुकास्पद आहे.
ajitpatankar
7 वर्षांपूर्वीग्राहक पंचायतीचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.. निरलसपणे काम करणारी मंडळी, ग्राहक जागृतीचे काम समर्थपणे करीत आहेत.. गिरगावात राहात असताना आमचाही एक ग्राहक संघ होता. त्यामुळे ग्राहक पंचायतीच्या ग्राहकोपायोगी मालाच्या वितरणाचा सुखद अनुभव आहे.. पैशाच्या बचतीचा भाग तर आहेच शिवाय मालाच्या शुद्धतेची खात्री. साबण, मध.. सारख्या वस्तू कुठच्या कंपनीने बनविलेल्या आहेत हे पाहण्याची तसदी देखील घेतली जात नसे.. कारण एकच... ग्राहक पंचायतीमार्फत आलेला माल शुद्धच असणार असा ठाम विश्वास. आणि तो सार्थही आहे... लेखात नमूद केलेल्या अनेक यशस्वी पंचायतीच्या लौकिकाला साजेशा आहेत.... मात्र आज असं वाटतं की, जागतिक व्यापाराच्या बदलत्या स्वरूपाचे अवधान ठेवून, ग्राहक पंचायतीने तर्काला पटले नाही, तरी काही ठिकाणी आपली शक्ती खर्च करू नये..
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीhttp://mumbaigrahakpanchayat.org/ या साईटवर सर्व माहिती आहे.
Namratadholekadu
7 वर्षांपूर्वीखूपच छान माहिती मिळाली. शुभदा चौकर मॅडम यांचा नेहमीप्रमाणेच वाचकांचे वैचारिक उद्बोधन करणारा उत्तम लेख,?
Mrudula
7 वर्षांपूर्वीमुंबई ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासून ते आजवरच्या ४४ वर्षांच्या कार्याचा अतिशय उत्तम असा सर्वंकष आढावा या लेखात घेतला आहे त्याबद्दल लेखिका शुभदा चौकर यांचे आणि आपले अभिनंदन. या संस्थेच्या लोकल ते ग्लोबल प्रवासाचे खरे श्रेय अत्यंत तळमळीने निरंतर झटणाऱ्या निरलस कार्यकर्त्यांना द्यायला हवे. मधुकर मंत्री, शिरीष देशपांडे, गंंगाधर गाडगीळ यांच्या समर्थ नेतृत्वालाही बरेचसे श्रेय जाते. या लेखाच्या निमित्ताने या सेवाभावी संस्थेचा परिचय करून दिल्याबद्दल आपले आभार.
bookworm
7 वर्षांपूर्वीसभासद कसे होता येईल?
shubhadabodas
7 वर्षांपूर्वीआमचा ग्राहक पंचायतीचा अनुभव अतिशय चांगला होता. परिस्थिती वश मला सभासदत्व रद्द करावे लागले.
Achninad
7 वर्षांपूर्वीअतिशय माहितीपूर्ण लेख. पंचायतीचे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो.