मृत्यूनंतरचे (आर्थिक ) जग ... त्यासाठी नॉमिनेशन

पुनश्च    उदय कर्वे    2018-07-18 06:00:54   

अंक- आरोग्यसंस्कार   पुनश्चद्वारा आजवर इथे देण्यात आलेल्या लेखांमध्ये आर्थिक विषयावर लेख जवळपास नव्हतेच. आर्थिक संकल्पना आणि अर्थविषयक प्राथमिक समजूती कधी बदलत नाहीत परंतु आर्थिक संदर्भ मात्र सतत बदलत असतात, त्यामुळे  या विषयावरील लेख लवकर कालबाह्य ठरतात. परंतु नामनिर्देशन, अर्थात नॉमिनेशन हा विषय कधीही न संपणारा आहे. एखादा माणूस  संपला तरी तो विषय राहतो, किंबहुना अधिक महत्वाचा होतो...आपला आर्थिक, सांपत्तिक वारस ठरवण्याविषयीचा हा डोंबिवली नागरी बँकेचे अध्यक्ष आणि सीए श्री. उदय कर्वे यांचा लेख, एकाचवेळी गंभीर तरीही गंमतीदार... तुमच्या मृत्युसमयी तुमच्या नावावर बँकेत असलेल्या रकमेचा आकार हे सांगतो, की तुम्ही जिवंतपणी अनावश्यक अशी, जास्तीची कमाई करण्यात किती काळ वाया घालवलात.... अशा अर्थाचे एक गंमतीशीर वाक्य आहे. पण अर्थात हे वाक्य त्यांनाच लागू पडते ज्यांच्या पश्चात कोणालाच या रकमेची गरज असणार नाही. बाकी सर्वांच्या बाबतीत, आपल्या पश्चात आपली रक्कम ज्याला मिळावी अशी त्यांची इच्छा असेल त्याला ती सुलभपणे, सहज मिळण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते. अशी व्यवस्था केली नाही तर मरणार्‍यांसाठी मृत्यूनंतरचे जग विलोभनीय, स्वर्गीय असेलही पण वारसांचे जग मात्र मनस्तापाच्या नरकाचे ठरते. हे टाळण्यासाठी दोन महत्त्वाचे उपाय! एक म्हणजे मृत्युपत्र आणि दुसरे म्हणजे नॉमिनेशन (नामनिर्देशन). कुसुमाग्रजांनी कशाकशावर प्रेम करावे हे सांगितलंय. ”प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, प्रेम त्यागावर करावं...” अशी बरीच मोठी यादी सांगण्याआधी सुरुवातीलाच ”प्रेम कुणावरही करावं” असं ”सर्वव्यापक” प्रेम करावं असं ते म्हणतात! त्याचप्रमाणे नॉमिनेशन देखील बचत खात्याच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्यसंस्कार , अर्थकारण

प्रतिक्रिया

 1. ATULGODBOLE

    3 वर्षांपूर्वी

  छान माहिती पूर्ण लेख

 2. avthite

    3 वर्षांपूर्वी

  मस्त लेख.. नॉमिनेशन सारखी मुलभूत सुविधा किती महत्त्वाची आहे हे लक्षात आले..

 3. Suhasthatte

    3 वर्षांपूर्वी

  नाँमिनेशन पेक्शा वारसा हक्क कायद्या प्रमाणे विल म्हणजे म्रूत्यूपत्र करणे रास्त कारण नाँमिनीला वारसा हक्क कायद्याने अन्य वारस न्यायालयात आव्हान देऊ शकतात .

 4. symghar

    3 वर्षांपूर्वी

  ऊपयुक्त लेख व माहीती.

 5. TINGDU

    3 वर्षांपूर्वी

  लेख माहितीपूर्ण आहे. येथे मी नमूद करु इच्छितो कि आवश्यक नाही कि नामीत व्यक्ति नेहमी वारसदार असेलच. नामीत व्यक्ति नाॅमिनेशन करणार्‍या व्यक्तीच्या मृत्यु नंतर त्याच्या संपत्तिची वारसदारां मध्ये सुलभतेने वाटणी करुन विल्हेवाट लावतो.

 6. किरण भिडे

    3 वर्षांपूर्वी

  कृपया [email protected] या मेल आयडीवर किंवा 98198 66201 या फोन नंबरवर संपर्क साधावा.

 7. deepa_ajay

    3 वर्षांपूर्वी

  फक्त nomine देऊन चालत नाही, will किंवा मृत्यू पत्र सगळ्यात उत्तम

 8. srija

    3 वर्षांपूर्वी

  नॉमिनेशन आणि legal heirs यामधला फरक, याबद्धलची माहिती अपेक्षित होती.

 9. Vidyagune

    3 वर्षांपूर्वी

  लेख माहितीपूर्ण आहे आणि त्याची सगळ्यांनीच अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

 10. Anjalisjoshi

    3 वर्षांपूर्वी

  उपयुक्त लेख आणि सहज सोप्या भाषेत.

 11. Babaakt

    3 वर्षांपूर्वी

  Valuable information.

 12. bhushanpathak

    3 वर्षांपूर्वी

  गंभीर स्वरूपाची माहिती अगदी सुटसुटीत, सोप्या पद्धतीने दिली। आभार।

 13. maheshbapat63

    3 वर्षांपूर्वी

  माहिती पूर्ण लेख

 14. AMKHADILKAR

    3 वर्षांपूर्वी

  अतिशय माहितीपूर्ण लेख... पुनश्च मध्ये आर्थिक बाबींवर अश्याच प्रकारे लेख प्रकाशित करत रहावे जाता जाता एक माहिती :- करंट अकाऊंट जर व्यक्तिगत नावाने किंवा प्रोपरायटरी फर्मचे असेल तरच अश्या खातेदाराला नाॅमिनेशन करता येते

 15. jayashree.galgali

    3 वर्षांपूर्वी

  छान माहिती दिलीत.

 16. ddj60

    3 वर्षांपूर्वी

  उदय कर्वे माझे खूप जुने मित्र आहेत. सी ए व बँकेचे अध्यक्ष असण्याबरोबरच ते नर्मविनोदी पण उपयुक्त लेखन करू शकतात हे त्यांनी जगासमोर आणले हे उत्तमच! अभिनंदन उदय जी!

 17. Suvarna

    3 वर्षांपूर्वी

  Chan Mahiti.

 18. AartiMunishwar

    3 वर्षांपूर्वी

  लेख उपयुक्त आणि सहज सोप्या भाषेत

 19. Mannishalohokare

    3 वर्षांपूर्वी

  खूप बहुमूल्य महिती मिळाली . जाता जाता मात्र खरंच अंमलात आणायला हवं .

 20. sharadbhau

    3 वर्षांपूर्वी

  सोप्या भाषेत उपयुक्त माहिती समजली धन्यवाद

 21. किरण भिडे

    3 वर्षांपूर्वी

  9152255235 या नंबरवर whatsapp मेसेज पाठवा. तिथून आपल्याला मार्गदर्शन मिळेल.

 22. SUSHYANAND

    3 वर्षांपूर्वी

  छान उपयुक्त लेख अाहे.

 23. अनिता ठाकूर.

    3 वर्षांपूर्वी

  मी चाचणी सभासद आहे. मला सशुल्क सभासद व्हायचे आहे. पण तांत्रिक बाबी मला जुजबी समजतात व त्यामुळे मला सशुल्क सभासद होता येत नाहीये. कृपया त्यासाठी मला मदत करावी.

 24. anapatil

    3 वर्षांपूर्वी

  Changi mahiti

 25. Anitapp

    3 वर्षांपूर्वी

  फारच उपयुक्त लेख.

 26. shilpa1952

    3 वर्षांपूर्वी

  नॉमिनेशन केले असले तरीही बाकीच्या वारसदारांच्या सह्या का लागतात ते कृपया सांगावे

 27. Nav1406

    3 वर्षांपूर्वी

  नोमिनेशन सारखा महत्त्वाचा विषय अत्यंत सोप्या भाषेत सांगितला, धन्यवाद.

 28. bookworm

    3 वर्षांपूर्वी

  माहितीपूर्ण लेख! नामनिर्देशन न केल्याने होणार्या तोट्यांबद्दल एक परिच्छेद असता तर अजून माहिती मिळाली असती.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen