रक्त आणि तेल


मध्यपूर्वेच्या रक्तलांच्छित शंभरीची सुरुवात आणि सौदी अरेबिया, इस्त्राईल, जोर्डन, इराक, सिरीया, इराण, लेबनॉन या सात राष्ट्रांची निर्मिती या विषयावर सुप्रसिद्ध लेखक जयराज साळगावकर यांचे '१९१७: द ग्रेट गेम' नावाचे पुस्तक लवकरच परममित्र प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकाची ओळख... ******** औद्योगिक क्रांतीमध्ये जनावरे व माणसाच्या जागी श्रम करणारी यंत्रे आली. तरफ किंवा प्राण्यांच्या ऊर्जेचा वापर पुरेनासा झाला. मग इंधन म्हणून कोळशाचा वापर सुरू झाला. कोळशाला मर्यादा होत्या. त्याचे उत्पादन खर्चिक होते. मानवी जीव धोक्यात घालून कोळसा मिळवावा लागत होता. पुढे या कामगारांच्या युनियन अस्तित्वात आल्या. पुढे या युनियन राजकीय लोकांच्या हाती गेल्या. कोळशाच्या खाणींत राजकारण घुसले. संप-आंदोलने आली, त्यात तेलाचे महत्त्व पुन्हा वाढले. १९२० च्या दशकात कुवेत आणि इराणमध्ये चांगल्या प्रतीच्या तेलाचे मोठे साठे सापडले. त्याचवेळी जगात इतरत्र म्हणजे व्हिएनझुएला, इराक, कुवेत, लेबनॉन, सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबिया येथेही तेल मिळू लागले. १८८५ मध्ये गोटालियाब डॅमलर (डॅमलर बेन्झ) या जर्मन इंजीनीअरने मोटारगाडीचा शोध लावला. त्यामुळे पुन्हा पेट्रोलची मागणी वाढू लागली. पहिल्या महायुद्धात (१९१२-१९१९) ट्रक्स, रणगाडे, चिलखती गाड्या यांना मोठ्या प्रमाणात तेल लागू लागले. त्याच दरम्यान कोळशाच्या- वाफेच्या इंजिनावर धावणार्‍या गाड्या डिझेलवर धावू लागल्या होत्या. कारखान्यांतील कोळशावर चालणारे बॉयलर जाऊन त्या जागी फर्नेस ऑईलवर चालणारे बॉयलर आले. मालवाहू जहाजे व युद्धनौका कोळशाच्या-वाफेच्या इंजिनाऐवजी डिझेलवर धावू लागल्या होत्या. तेल कोळशापेक्षा स्वस्त होते. वाहतुकीसाठी सोपे होते. साठवणुकीसाठी सोयीस्कर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


जयराज साळगावकर , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. TINGDU

    3 वर्षांपूर्वी

  किती वेळा लिहीणार. चार काय चाळीस शब्द लिहून झाले पण नोंद होतच नाही. संक्षिप्त अभिप्राय म्हणजे लेख आवडला.

 2. TINGDU

    3 वर्षांपूर्वी

  लेख आवडला. ह्या आधी गिरीश कुबेर लिखित पुस्तक वाचले होते. दोन्ही मधील माहिती जवळपास सारखीच आहे.

 3. prithvithakur1

    3 वर्षांपूर्वी

  लेख चांगला आहे. मात्र यातला "करामती कारस्थानी कृष्ण भगवान" हा उल्लेख खटकला. तोअनाठायी व अप्रस्तुत वाटतो. कृष्ण भगवान करामती व कारस्थानी कसे होते ? त्यांची आणि किसिंजर ची तुलना कशी होऊ शकेल? कृष्ण हे शांतीदूत होते तर किसिंजर हा आगलाव्या होता. चांगला लेख सुद्धा एखाद्या फाजीलपणामुळे बिघडतो त्याचे हे नमुनेदार उदाहरण.

 4. ulhas

    3 वर्षांपूर्वी

  तरफ व उर्जा संबंधी वर केलेला उल्लेख अनावधानाने झाला.क्षमस्व!

 5. ulhas

    3 वर्षांपूर्वी

  "एका तेलियाने व तेल नावाचा इतिहास"ही पुस्तके ज्यांनी वाचली आहेत त्यांना ह्या पुस्तकात धर्म, दहशदवादी संघटना, त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरील पगडा, हस्तक्षेप ह्या गेल्या १०/१५वर्षातील नवीन घटनांची माहिती मिळेल असे ह्या लेखावरून जाणवते. पुस्तकाची वाट बघू. एक छोटी दुरूस्ती.... तरफ हा उर्जेचा प्रकार नाही. कमी उर्जा वापरून जास्त काम करणारे यंत्र आहे ह्याची नोंद घ्यावी.

 6. kamalakar keshav panchal

    3 वर्षांपूर्वी

  जयराज साळगांवकर यांचा रक्त आणि तेल हा लेख वाचला . खरे तर साळगावकर अथॅशास्त्रीय अभ्यासक, त्यांची विवेचन शैली अत्यंत मामिॅक आहे. त्यांचे आगामी पुस्तक वाचायला नक्की आवडेल.

 7. किरण भिडे

    3 वर्षांपूर्वी

  सशुल्क सभासदांसाठी दर बुधवार आणि शनिवार संरक्षित लेख असतात. आपण १०० रुपये त्या १०४ ( ५२*२ )लेखांचे घेतो. त्याशिवाय काही लेख असतात जे आपल्याला निःशुल्क मिळतात ( जसा हा आजचा ) किंवा एवढे मोठे नसतात ( हजार शब्दांपेक्षा कमी) की ते सशुल्क मध्ये द्यावेत. म्हणून मग आपण ते अवांतर मध्ये निःशुल्क देतो. त्यातून अजून एक गोष्ट साध्य होते की काही वाचक ज्यांना अजून पुनश्च बद्दल माहिती नाही, त्यांना हा लेख आपण forward करू शकता. त्या योगे ते तो लेख वाचून सभासद होण्याचा विचार करतील.

 8. vasant deshpande

    3 वर्षांपूर्वी

  शंभर रुपये भरूनही सभासदांसाठीचे ''अवांतर लेख'' निःशुल्क कसे, हे कृपया स्पष्ट कराल का?वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen