पुस्तके खरीदण्याचा आनंद

पुनश्च    व्ही.नर्ला    2018-07-23 18:00:27   

बॉल्डविन एकदा म्हणाले होते, ‘‘उसनी आणलेल्या पुस्तकांपासून मिळणारा आनंद अत्यल्प असतो.’’ त्याच्या या मताशी मी संपूर्णपणे सहमत आहे. पुस्तक स्वत:चे असले म्हणजे ते एका बैठकीत वाचून काढण्याची गरज नसते. जेव्हा वाचावेसे वाटेल तेव्हा, जेवढे वाचावेसे वाटेल तेवढे, सावकाश, मजेने आणि निवांतपणे ते वाचता येते. असे पुस्तक वाचायला घेतल्यावर, ते वाचण्यासारखे असले तर एकाच बैठकीत पुरे करता येते, वाचीत असताना मनात आलेले विचार नोंदून ठेवता येतात व विशेष लक्षात ठेवण्याजोगा ओळींखाली तांबड्या पेन्सिलीने रेघाही ओढून ठेवता येतात.

तसे पाहिले तर आपले मूल आणि दुसऱ्याचे मूल यांच्यामध्ये जो फरक असतो तोच स्वत:चे पुस्तक आणि दुसऱ्याकडून मागून आणलेले पुस्तक यांमध्ये असतो, हा माझा स्वत:चा अनुभव आहे. आणि त्यामुळे पैसे नसले तरी पुस्तके खरेदी करण्याची माझी सवय कायम आहे.

स्वत: पुस्तके खरेदी न करता त्यांचा संग्रह मात्र करणारे काही भाग्यवान लोक असतात. वास्तविक पाहता ही गोष्ट अगदी साधी आहे. ‘‘जरा हे पुस्तक द्या ना, वाचून परत करीन’’ असे नम्रपणे म्हणून पुस्तक आणायचे आणि ते आपल्या संग्रहात ठेवून द्यायचे. पुस्तक देणारा मनुष्य लोभी असला व आपले पुस्तक परत करण्याचा लकडा लावू लागला ‘‘तर उद्या देतो’’ असे सांगून त्याची ब्याद निकालात काढता येते. दहा वीस वेळा अशी टोलवाटोलवी केली की तो कंटाळून जातो. किंवा, ‘‘तुमचं पुस्तक कुठे ठेवलंय ते सापडतच नाही. बहुधा हरवलं असावं; पण मी तुम्हाला नवीन घेऊन देतो.’’ असे सांगावे. तो माणूस सज्जन असला तर म्हणेल, ‘‘जाऊ दे हो; एवढं कशाला मनाला लावून घेता? तो तसे म्हणाला नाही तर, ‘‘उद्या विकत आणून देतो,’’ असे प्रत्येक भेटीच्या वेळेस सांगून बरेच दिवस ढकलता येतात. एवढे करूनही त्याने आपली मागणी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


व्ही. नर्ला , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.