दुसऱ्या महायुद्धाच्या अंतीम टप्प्यात जपानमधील हिरोशिमा या शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आल्यानंतर जगभरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाठोपाठ ९ ऑगस्टला नागासकीवरही अणुबॉम्ब टाकला गेला. अणुबॉम्बच्या या विध्वंसक परिणामामुळे केवळ नागरिकच नाही तर शास्त्रज्ञही चिंताग्रस्त झाले. या बॉम्बचे जनक डॉ. ओपेनहाइमर यांनी तर पुढे पश्चातापामुळे राजीनामा दिला. अणूबॉम्ब पडल्यावर या दोन शहरांत नेमके काय आणि कसे झाले याचे श्रीकांत राजाराम आंबेकर यांनी प्रस्तुत लेखात केलेले वर्णन हे मनात त्या कृतीबद्दल राग,घृणा उत्पन्न करते. चित्रमय शैलीतील शब्दांकन छातीत धडकी भरवते. दोस्त राष्ट्रांचा हिंसक चेहरा मग अधिकच उग्र वाटू लागतो. विन्स्टन चर्चिल यांनी अणूबॉम्बचा शोध ही ईश्वरी कृपा आहे, असे म्हटले होते. ही ईश्वरी कृपा हजारो लोकांसाठी कोप ठरली! ******** १९४५ च्या बर्लिन परिषदेत जपानवर अण्वस्त्रहल्ला करण्याचा निर्णय संमत करण्यात आला त्याचवेळी हिरोशिमा आणि नागासकीच्या मृत्युलेखाचे आद्याक्षर लिहिले गेले. ७ जुलैला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रूमन यांनी ‘अमेरिकेने नवीन अणू बॉम्ब तयार केले असून त्यांचा मारा जरूर पडल्यास जपानवर करण्यात येईल’ असा जाहीर इशारा देऊन ठेवला. या सुमारास न्यू मेक्सिकोतील लॉस अॅलामॉस येथे चालू असलेले अणुबॉम्बवरील संशोधन वेगाने नियोजित टप्पा गाठू पाहात होते. या कामासाठी आतापर्यंत पन्नास कोटी पौंड उधळण्यात आले होते. आणि त्या मितीला ६५००० अमेरिकन कामगार अणुबॉम्ब उत्पादनाप्रीत्यर्थ अमेरिकेत खपत होते. अखेरीस तो क्रांतिकारी क्षण येऊन ठेपला. १६ जुलै, १९४५! पहाटे साडेपाचची वेळ!!... मेक्सिकोच्या वाळवंटात १६०मैल आत अलमोगार्डो येथे उभारण्यात आलेल्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
kaustubhtamhankar
7 वर्षांपूर्वी६आॅगस्ट , ९ आॅगस्ट - १९४५- जपान आणि १५ आॅगस्ट १९४७ - भारत वेळ तेवढाच आज जपान कुठे आहे , आणि आपण कुठे आहोत जपान्यांनी नारे शब्द टाकून दिला आपण फक्त नारे लगावत बसलो आहोत! तुलना केली तर खडबडून जागे होऊ आज आपण कशाची तुलना करायची ? हेच विसरलो आहोत! जागे करणारा लेख. अप्रतीम कौस्तुभ ताम्हनकर ९८१९७४५३९३
drsubodhkhare
7 वर्षांपूर्वीऑटो हान याना नोबेल पुरस्कार दिला तो अणुबॉम्बच्या शोधासाठी नव्हे तर मोठ्या अणुकेंद्राचे भंजन करून अणुकेंद्रकिय उर्जा मुक्त करता येते यासाठी. या शोधामुळे तुम्हाला अणुकेंद्रकातील शक्ती मुक्त करता येते. त्याव्ह उपयोग अणुबॉम्ब साठी करा किंवा वीज निर्मिती साठी हे उपयोग करणार्यांवर अवलंबून आहे. सुरीने तुम्हाला स्वयंपाक करता येतो तसेच एखाद्याचा खून सुद्धा. यात सुरीचा शोध लावणाऱ्याला दोषी ठरवणे चूक आहे.
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीअहो फारच भयानक माणुसकी वगैरे हे शब्द फोल ठरतात, आणि आमचं दुर्दैव ह्या च गोऱ्या लोकांचं आम्हाला नको इतकं कौतुक वाटतं
Sachinkachure
7 वर्षांपूर्वीयाच विन्स्टन चर्चिलचा दाखला कुण्या एका शहाण्याने आज लोकसता मध्ये भारताला नावे ठेवण्यासाठी दिला होता... माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य चर्चिलचा देवाचा आशीर्वाद वाटला... अशा हरामखोराचे भारता विषयीचे विचार कसे चांगले असू शकतील?
rajashreejoshi
7 वर्षांपूर्वीअतिशय भयानक...
CDKavathekar
7 वर्षांपूर्वीपृथ्वीतलावर मानवी जीव अस्तित्वात आल्यापासून त्याच्यात युद्धखोरीचा अवगुण आहेच,दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अशा महाभयानक विध्वंस होऊनच झाला की ज्यायोगे 1939 पासून सुरू असलेल्या युद्धात झालेला विध्वंस विसरला जावा,आणि त्यानंतर ही गेली 73 वर्षे जगात कोठेंना कोठे लहान मोठी युद्ध सुरूच आहेत आणि माझ्या मते हीच मोठी शोकांतिका आहे.
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वीलेख वाचून मन सुन्न झाले. प्रत्यक्ष अनुभवले त्यांचे काय झाले असेल?
arush
7 वर्षांपूर्वीयुद्धाची दाहकता पुन्हा एकदा खूप तीव्रतेने जाणवली
drvyankatesh
7 वर्षांपूर्वीआतापर्यंत या अणुबाँब परिणाम जाणवत होते पाकिस्तानातील अणुबाँब दहशतवाद्याच्या हातात पडली तर त्याचा पहिला प्रयोग भारतावरच होणार आहे त्यामुळे भारत पाकिस्तान दोन्ही देशान सबुरीन घेतल पाहीजे