'लोकशाही राजकारणांत सामान्यपणे जबाबदारीने टीका व्हावी अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. लोकशाही म्हणजे पक्षीय राजकारण आणि त्याची पुरी टीकेत तळल्याशिवाय तयार होत नाही, फुगत नाही आणि बव्हंशी ती टीका उफाळणारी, उचंबळणारी असते...' हे मनोगत आजच्या काळातले नसून तब्बल पन्नास वर्षांपूर्वीचे आहे. भारताचे पहिले मंत्रिमंडळ तयार होत असताना आपली मनःस्थिती कशी होती हे सांगताना काकासाहेब गाडगीळ यांनी ऑक्टोबर १९६३ च्या 'चित्रमयजगत्' च्याअंकात हे लिहिले होते. सत्ता आणि पद याकडे पाहण्याची काकासाहेब गाडगीळ आणि समकालिनांची दृष्टी काय होती याचे अंगावर सुखाचा काटा फुलावा असे वर्णन त्यांनी केले आहे आणि त्याचवेळी काही कटू वास्तवही लिहिलेले आहे. या मराठी नेत्याचा राष्ट्रव्यापी विचार आणि अतिशय मार्मिक अशी मराठी भाषा यासाठीही हा लेख वाचलाच पाहिजे. स्वातंत्र्य मिळण्याआधीची ही शेवटची रात्र... १ ऑगस्टला विमानाने मुंबईस निघण्यापूर्वी पंडितजींनी ३१ जुलैला मला बोलावले होते. ३० जुलैला रात्री सुमारे ९ च्या सुमारास त्यांच्या खाजगी चिटणीसाचा म्हणजे मथाईचा फोन आला होता. त्याने सांगितले की, उद्या सकाळी ९ वाजता पंडितजींना भेटावे, असे पंडितजींनी सांगितले आहे. मी त्याचा अर्थ समजलो की, उद्या मंत्रिमंडळाबद्दल ते आपल्याला विचारणार. रात्रभर बराच वेळपर्यंत मी विचार करीत होतो. कोठून निघालो व कोणत्या मुक्कामाला येत आहे ? ह्या विचाराने सुखी व दुःखी दोन्ही झालो होतो. स्वातंत्र्य मिळणार होते. त्याची किंमत जबरदस्त द्यावी लागत होती. त्यातून निर्माण होणारे सुख उधार होते. दुःख रोखीने मिळत होते. दररोज अत्याचाराच्या व दंग्यांच्या बातम्या येत होत्या. विवेकाला नक्की प्र ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
rajashreejoshi
7 वर्षांपूर्वीछान लेख
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वीउत्तम लेख. सुवर्णस्मृतीत जपण्याचा काळ आणि आठवण
hpkher
7 वर्षांपूर्वीउत्तम काकासाहेब गडगीळांची शैली सुंदर आहे त्यांच्या पुस्तकांचे पुनर्मुद्रण झाले तर चांगले.
sujata17
7 वर्षांपूर्वीअसे प्रगल्भ विचार असणारे काही मोजके लोक जरी आज राजकारणात असते तर काही चांगलं चित्र दिसलं असतं .
kamalakarpanchal
7 वर्षांपूर्वीकाकासाहेब गाडगीळ यांचा लेख वाचला, १९६३ सालातल्या या लेखाची उपयुक्तता ७०-७५ वर्षानंतर सुध्दा जाणवावी इतकी शक्ती त्यात दिसून येते. शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडा आम्हाला होता बहुतेक तो प्रवासवर्णन या स्वरूपाचा असावा. काकासाहेबांसारख्या मुरब्बी राजकारणी व्यक्तिमत्वाची ओळख या लेखामधून होते. भारतीय राजकारणात सक्रिय असलेली मराठी नेतेमंडळी त्या काळी सुध्द्दा दिल्लीतल्या लाळघोट्या राजकारणी लोकांपासून सावध होती. किंबहुना यशवंतरावा चा सुध्दा यास अपवाद नव्हता. आजच्या प्रत्येक राजकीय व्यक्तीने यांच्यापासून थोडेजरी आचरण करण्याचा प्रयत्न केला तरी भारतीय राजकारणाची खालावलेली स्थिती सुधारण्यास मदत होईल. इतका अप्रतिम लेख आपण वाचण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपले शतशः आभार. असेच निवडक लेख सादर करून आमचा वाचनानंद वृद्दीन्गत करावा.धन्यवाद.
asmitaph
7 वर्षांपूर्वीSorry to use english. Nice article.!
Meenal Ogale
7 वर्षांपूर्वीअतिशय वाचनीय लेख आहे.राजकारणासारख्या गंभीर विषयावर लिहीताना सुद्धा मिश्किल शैली प्रत्ययास येते.त्या काळी सुद्धा आयत्या वेळी खातेबदल वगैरे होत होते हे लक्षांत येऊन मजा वाटली.खास उल्लेख लेखाला जोडलेल्या परिशिष्टाबद्दल करायचा आहे,त्यात दिलेली काकासाहेबांबद्दलची माहिती फारच उपयुक्त आहे.त्यांनी पंजाबचे राज्यपाल असतांना एक वाघाचे पिल्लू पाळले होते.ते मोठे झाल्यावर तिची रवानगी प्राणीसंग्रहालयात करण्यात आली.तेव्हां मुलीला सासरी पाठवताना वाटणाऱ्या भावना त्यांच्या मनांत आल्या.लाडक्या राणीस अशा नांवाचा एक लेख एका दिवाळी अंकात वाचल्याचे स्मरते.धन्यवाद
Sunanda
7 वर्षांपूर्वीधन्यवाद. सकस काही वाचायला मिळाले.