अंक- युगवाणी; वर्ष-ऑक्टोबर १९६९
(विनोबा भावे यांनी १० ऑगस्ट, १९६९ रोजी रांची येथे अखिल भारतीय झारखंड पार्टीच्या कार्यकारिणीपुढे केलेले भाषण)
विनोबा भावे हे एक न उलगडणारं कोडं होतं. त्यांच्या तल्लख बुध्दीचा आणि तर्कबुद्धीचा प्रत्यय त्यांच्या वागण्या-बोलण्या आणि लिहिण्यातून सतत येत असे. छोटी राज्ये ही विकासाची गुरूकिल्ली वगैरे म्हटले जाते,परंतु मुळात छोटे काय आणि मोठे काय, राज्य चालविणारी माणसे ते कधी लोकांसाठी चालवणारच नाहीत, अशी विनोबांना खात्री पटली होती. वेगळ्या राज्यासाठी आंदोलन करणाऱ्यांसमोर भाषण करुन त्यांना वेगळेपणातले वैयर्थ सांगण्यास मोठेच धाडस लागते. विनोबांचे हे भाषण आहे, १० ऑगस्ट, १९६९ रोजी रांची येथे अखिल भारतीय झारखंड पार्टीच्या कार्यकारिणीपुढे केलेले. त्यानंतर ३१ वर्षांनी म्हणजे १५ नोव्हेंबर २००० रोजी अखेर झारखंड हे स्वतंत्र राज्य जन्माला आलेच. परंतु त्या राज्याची आणि एकूणच देशातली आजची परिस्थिती पाहता विनोबा केवळ स्पष्टवक्तेच नव्हे तर द्रष्टेही होते हे लक्षात येते. ******** आपण झारखंडासंबंधीचा प्रश्न पुढे ठेवला. जेथपर्यंत माझा स्वत:चा संबंध आहे तेथपर्यंत माझा ह्या असल्या ‘खंडां’वर विश्वास नाही हे मी सांगून टाकतो. हा ‘पोलिटिकल’ म्हणजे राजकीय विचार आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत भारतात अनेक प्रांत बनले आणि नष्ट झाले. मुख्य गोष्ट आहे ती प्रांत निर्माण होण्याची नाही, तर जन-शक्ती, लोक-शक्ती निर्माण झाली पाहिजे ही आहे. झारखंड निर्माण झाले तर काय होईल? काही माणसांना गव्हर्नर वगैरे बनवण्याचा अवसर मिळेल, पण जनता मात्र होती तिथेच राहील. इंग्लंडमधील एका मित्राने मला पत्र लिहिले आहे त्यावरून मला ह्या बाबतीत एक मोठाच पुरावा मिळाला. त्याने पत्रात लिहिले आहे, ‘‘तुमच्या ह्या आंदोलनाची आम्हाला इंग्लंडमध्ये गरज आहे, एवढेच नाही तर, साऱ्या जगाला आज त्याची गरज आहे, कारण तुम्ही लोक-शक्
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीबरोबर आहे.
Renkoji Dahe
4 वर्षांपूर्वीमाझं जे काही भलं करायचं, ते इतरांनी..या विचारातून आजही समाजमन बाहेर पडले नाही. माझ्या प्रगतीसाठी मीच प्रयत्न करायला हवे, हा मूलभूत विचार इथल्या समाजात रूजला नाही पाहिजे, लोक पूर्णतः सरकार पक्षावर अवलंबून राहिले पाहिजेत, असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले..आजही आम्ही त्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडलो नाही. याला अपवाद ना शहरी, ना ग्रामीण..सर्वांची सारखीच मानसिकता आहे.. खूप परखड, दृष्टे विचार..✍👌👌
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीकिती परखड विचार मांडले आहेत. अगदी मुळात काय आवश्यक आहे हे योग्यरीत्या मांडले ईहे.
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीकिती प्रकरणे मांडावेत विचार,अप्रतीम
arya
7 वर्षांपूर्वीखूप छान लेख आहे.किती तुकडे करणार?
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीअतिशय मार्मिक लेख, आज 2018 साली सुद्धा लागू होतोय, आपण काहीच करत नाही सगळं सरकार नामक यंत्रणेने करावं अशी आमची "माफक" अपेक्षा असते आणि काहीच होत नाही म्हणून बोट मोडत बसायचे
Sachinkachure
7 वर्षांपूर्वीकाही लोक स्वतःला सर्वज्ञानी समजतात... विनोबा भावे हे त्यातीलच एक... अर्थात ते गांधीचेच शिष्य... म्हणजे हा दुर्गुण गांधींतूनच यांच्याकडे आला आहे... अर्थशास्त्राचा काडीचाही गन्ध यांना नव्हता... छोटे राज्य हे नेहमीच जास्त प्रगती करू शकते हे आज गोवा... दिल्ली... अगदी तेलंगाणा... झारखंड ने सिद्ध केले आहे... त्यामुळे हा विरोध हा कुठल्याही सबळ कारणांवरून झाला नव्हता हे स्पष्ट आहे... विनोबांनी आणीबाणी सारख्या गुलामगिरीत टाकणाऱ्या कृत्याला पाठिंबा दिला यावरूनच त्यांची अक्कल दिसून येते... अर्थात याचे बक्षीस म्हणून त्यांना काँग्रेसने 'भारतरत्न' दिले हा ईतिहास सर्वज्ञात आहेच...
RParagK
7 वर्षांपूर्वीचांगला लेख आहे. विचारांना प्रवृत्त केले.
santya0405
7 वर्षांपूर्वीउद्धरवा स्वये आत्मा खचु देउ नये कधी ... गीताईतल्या ह्या श्लोकाप्रमाणे आचार्य विनोबांनी विभाजुन झारखंड मागणाऱ्या लोकांसमोर केलेले हे भाषण अत्यंत विलोभनिय आहे ह्यात शंका नाही. परंतु छोट्या राज्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांची मांडणी मात्र आधुनिकतेच्या कसोटीवर करण्याआधि तत्सदृश कालसापेक्षता मात्र आवर्जुन बघायला पाहिजे असे मात्र आवर्जुन वाटते.
Meenal Ogale
7 वर्षांपूर्वीअतिशय वाचनीय आणि विचार करायला लावणारा लेख.दे-ईझम हा शब्दप्रयोग चपखल आहे.दुसऱ्यावर जबाबदारी ढकलणे ती प्रवृत्ती सगळीकडे आहेच.छोटीछोटी राज्ये बनवणे कोणाच्यातरी फायद्याची ठरतात हे अगदीं चांगले स्पष्ट केले आहे.एका महान द्रष्ट्या व्यक्तीची काहीं बाबतीतली भिन्न मते न पटल्यामुळे त्यांची ज्या प्रकारे टर उडवली गेली ते न पटण्यासारखेच आहे.गीता प्रवचने हे विनोबांचे माझे अत्यंत आवडीने पुस्तक आहे.
aradhanakulkarni
7 वर्षांपूर्वीखूप छान. सोप्या शब्दात मोठ्या विषयाची मांडणी. येथे कर माझे जुळती. दुर्मिळ लेखाबद्दल आभार.
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वी50वर्षापूर्वीचा लेख. आजच्या परिस्थिती ला अनुलक्षून लिहिलेला जणू. 'दे' आझम सोडून 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा मंत्र अंगीकारला पाहिजे.
harshadp
7 वर्षांपूर्वीखूप छान लेख! त्यांच्या काळाहूनही ते किती पुढे होते! विनोबांचे अजून वाचायला आवडेल. त्यांनी आणीबाणीला का पाठिंबा दिला होता, हे कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय अभ्यासता येईल, असे लेखन कृृपया प्रसिद्ध करावे.