अंक- वसंत; वर्ष- सप्टेंबर १९८०
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचा पाया अनेकांचे बलिदान आणि क्रांतिकारकांच्या कारवाया यामुळे घातला गेला होता. त्यापैकी काहींचे प्रयत्न एकाकी होते, तर अनेकदा संपूर्ण घराणेच्या घराणेच क्रांतीकार्याला आणि स्वातंत्र्याच्या संग्रामाला वाहून घेत होते. त्यापैकी सगळ्यांची नावे आपल्याला ठावूक असतीलच असे नाही. उदाहरणार्थ भगतसिंग माहिती असतात परंतु त्यांच्या कुटुंबातील इतर नावे माहिती नसतात. भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्षातील ऑगस्ट महिन्याला निरोप देता देता अशा काही घराण्यांची ही माहिती. लोकशाहीच्या नावाने स्वातंत्र्याचा संकोच झाला तर ही ठिणगी पुन्हा पेटून उठते हे आपण पाहिले, भविष्यातही तशी परिस्थिती निर्माण झाली तर क्रांतीची ज्वाला धरणारे हात पुढे येतील असा दिलासा या प्रकारचे लेखन वाचताना मिळतो. वि.वि. बेनोडेकर यांचा हा मूळ लेख वसंतच्या अंकात सप्टेंबर १९८० मध्ये प्रसिद्ध झाला होता.
**********
अंक- वसंत; वर्ष- सप्टेंबर १९८० हिंदुस्थानला आंग्लांच्या परदास्यातून मुक्त करण्यासाठी एका व्यक्तीपासून तो घराण्यांच्या घराण्यांनी प्रयत्न केला आहे. वासुदेव बळवंत फडके यांच्या एकाकी प्रयत्नांपासून तो सिंधू या पंजाबी घराण्यापर्यंत अनेक व्यक्तींनी हे प्रयत्न केले आहेत.क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे हिंदुस्थानात पहिले प्रजातंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करणारे वीर ठरतात. त्यांच्या व्यक्तिगत दुःखातून विशाल राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या मनात दृढमूल झाली! हा पहिला प्रयत्न अपयशी ठरला! त्यानंतर – चापेकर या हरिभाऊ चापेकर कीर्तनकारांच्या ज्येष्ठ पुत्राने टिळकांच्या प्रेरणेने सशस्त्र क्रांतीचा दुसरा टप्पा आरंभिल
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Pradeep Manohar
7 वर्षांपूर्वीछान लेख ??
bookworm
7 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण लेख! राष्ट्र हिताच्या ध्येयाने प्रेरित अशा या देशभक्तांना विनम्र अभिवादन!
shubhadabodas
7 वर्षांपूर्वीअतिशय अनोखी पण महत्वाची माहिती मिळाली. असे अनेक अज्ञात स्वातंत्र्य सैनिक असतील. ह्या निमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण झाले.
gondyaaalare
7 वर्षांपूर्वीफार सुंदर माहिती . प्रत्येक क्रांतिकारी घराणे म्हणजे एक एक हिमनग जणू . जेवढे पाण्यावर ( ज्ञात ) त्याहून अनेक पटीने पाण्याखाली ( अज्ञात कुटूंबीय ) . ह्या सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना शतशः नमन .
Mrudula
7 वर्षांपूर्वीअत्यंत माहितीपूर्ण आणि स्फूर्तिप्रद लेख. अख्खी घराणीच्या घराणी क्रांतिकार्यात, कष्टप्रद कारावासात संपूर्ण हयात घालवत होती, हसतहसत फासावर जात होती.. कशासाठी? कुणासाठी? आज आम्ही यांना विसरलो आहोत का? त्यांचा त्याग वाया गेला का?
rajendrakadu
7 वर्षांपूर्वी---------------------------------------------------------------------------- वकिली व्यवसायात खोर्याने पैसा ओढणारे मोतीलालजी नेहरू, त्यांचा मुलगा बॅरिस्टर जवाहरलाल नेहरु (एकूण अकरा वर्षे तुरुंगवास), सून कमला नेहरु, नातजावई फिरोज गांधी (स्व लालबहादूर शास्त्री यांचेसोबत १९ महीने अलाहाबाद तुरुंगात व त्यानंतर दोनदा पुन्हा अटक), इंदिरा गांधी (कुमार वयातच वानरसेनेची स्थापना).