fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

ताक विकून लक्षाधीश होता येतेआरोग्य-भुवनाचे हेतु, आरोग्य-भुवनाचे चाललेले कार्य व इतर आरोग्यविषयक माहिती यांचा परिचय करून देण्याकरिता आरोग्य-भुवनाचे म्हणून एक मासिक काढण्याचा विचार पुष्कळ दिवसांचा होता. परंतु त्याला अनेक अडचणींमुळे मूर्तस्वरूप देण्याचा योग आजपर्यंत आला नाही. प्राविण्याचे संपादक श्री. ताम्हणकर यांजपाशी याबाबतीत विचारविनिमय करीत असता त्यांनी प्राविण्याचीच दोन पाने वरील कार्यासाठी उपयोगात आणण्याचे सुचविले व त्याप्रमाणे ती चालू महिन्यापासूनच देण्याचे अभिवचन देऊन नियोजित कार्याला मूर्तस्वरूप देण्याचा एक जलद व सोपा मार्ग दाखविला याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. स्वतंत्र मासिकाने निरनिराळ्या प्रकारे येणारी स्वतंत्र जबाबदारी या योजनेने कमी होणार असून नियमित गोष्टींकडे लक्ष देणे जास्त सुलभ होणार आहे. तेव्हा या अनपेक्षितपणे प्राप्त झालेल्या संधीचा फायदा घेऊन आपले उद्दिष्ट कार्य साधणे जास्त फायदेशीर होणार आहे. आज प्रथम आरोग्य भुवनाची स्थापना व त्याच्या कार्याचा प्रचार कसकसा होत गेला यासंबंधीच माहिती देण्याचा विचार आहे.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

 1. During my seven years of stay in Mumbapuri I have enjoyed diverse delicious dishes and tasty juices and drins at most of the places mentioned! For a bachelor like me indeed Mumbai was a heavenly place! What pains me most is many of the Marathi eateries have closed down even in Dadar and Girgaum leave aside those like Tambe’s near Bank Street in the Fort area!

 2. फार जुन्या काळातील लेख आहे.. स्मरणरंजनात गुंगून गेलो..

  तांबे आरोग्य भवन, वेलणकरांचे छत्रे कोल्हापुरी चिवडा, कोना हॉटेल, पणशीकर, बाबुराव पुरोहित, प्रकाश, सांडू, वीरकर आहार भवन, केळकर हॉटेल, मॉडर्न, कुलकर्णी …..
  किती नावे घ्यायची…
  शिवाय कामतांचे गोविंदाश्रम , उडप्याचे राजा रेस्टॉरंट, इराण्यांची व्हॉइस ऑफ इंडिया सारखी अनेक हॉटेल्स.. ग्रांट रोडचे मेरवान..
  काय काय वर्णन करावे..
  गिरगावकर असल्याने या सर्व हॉटेल मधील पदार्थांचा पूरेपर आनंद घेतला आहे.
  सर्वच पदार्थ उत्कृष्ट.. तरीदेखील काही पदार्थ ही प्रत्येकाची खासियत..
  तांबेंची ओल्या काजूंची उसळ, वेलणकरां कडील चिवडा, तेलपोळी, डाळींबी उसळ, कोना किंवा मॉडर्नचा खरवस, प्रकाशचा साबुदाणा वाडा, बटाटा पुरी, पियुष, पणशीकरांची दुधीवडी,आम्रखंड, बाबुराव पुरोहितांचे श्रीखंड, सांडूंची उपवासाची मिसळ, उपवासाचा बटाटा वाडा, कुलकर्णी यांची बटाटा भजी. वीरकरांची भोजन थाळी,..
  अहाहा…
  गेले ते दिवस…

  1. ही सगळी नावं आणि वर्णन वाचूनच तोंडाला पाणी सुटलं हो … :)

  2. असं ऐकून आहोत की ठाण्यात एक मेतकुट नावाचे हॉटेल आहे तिथे मराठमोळे पदार्थ बरे मिळतात. बघा…:-)

   1. होक्का, आम्हाला माहित नव्हते बुव्वा :)

Leave a Reply

Close Menu