काळकर्ते परांजपेः काही रंगतदार आठवणी


शि.म. परांजपे यांच्या नावाच्या आधी 'काळ'कर्ते हे शब्द जोडायची आणि वाचायची आपल्याला एवढी सवय होऊन गेलेली आहे की ते शब्द म्हणजे जणू त्यांच्या नावाचाच एक भाग आहे असे आपल्याला वाटते. परंतु त्यांचे कर्तृत्व आणि लेखनकर्तृत्वही चौफेर होते. गंभीर लिखाण करणाऱ्यांच्या लेखनात अनेकदा रसाळ शैली, ओघात येणारे विनोद यांचा अभाव असतो. शि.म. त्याला अपवाद होते. लिहिताना, बोलताना ते खूप गंमती जमती करत. ‘विष्णुसहस्रनाम’ या शीर्षकाच्या त्यांच्या एका लेखात त्यांनी सत्तावीस ओळींचं आणि दोनशेतीस शब्दांचं प्रदीर्घ वाक्य  लिहिलं होतं. १९२९ साली बेळगावमध्ये भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. टिळकांचे अनुयायी असलेले परांजपे टिळकांच्या मृत्यूंनतर गांधीवादाकडे वळले परंतु तिथे ते रमू शकले नाही. त्यांच्या लिखाणाएवढाच त्यांचा स्वभाव आणि वागणेही वैशिष्ट्पूर्ण होते. त्यांच्या स्वभावविशेषांचा हा रसाळ आलेख चितारला आहे सौ. निर्मला विजय गोखले यांनी. लेखिका बहुधा परांजपे यांच्या सासरकडून जवळच्या नातेवाईक असाव्यात. हा मूळ लेख सह्याद्री या साप्ताहिकात १९६८ साली प्रसिध्द झाला होता. ********** कै. शिवराम महादेव परांजपे हे आमच्या निकटच्यांपैकी होते. त्यामुळे त्यांना पाहिलेली व त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेली काही माणसे अद्याप आमच्या कुटुंबांत आहेत. प्रस्तुत आठवणी त्यांच्या पुतणीच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या आरंभी, महाराष्ट्रांत तेजस्वी पुरुषांची जी मालिका निर्माण झाली, तींत कै. शिवरामपंत परांजपे ह्यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी चालविलेले ‘काळ’ हे पत्र त्या काळी फार लोकप्रिय होते. त्या पत्रांतील लेखामुळे काही काळ ब्रिटिश ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्तीविशेष , सशुल्क , सह्याद्री

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    छान

  2. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान

  3. upd

      6 वर्षांपूर्वी

    सकुल ह्यांची प्रतिक्रिया वाचली आणि असे वाटले की,- 27 ओळी व 230 शब्दांचे वाक्य इथे उधृत करावे. जे उत्स्फूर्त असते त्यास लिहिण्याच्या मर्यादा बोलण्याच्या मर्यादेशी आणून भिडवाव्या लागत नाहीत. काळकर्त्यांच्या वक्तृत्वाशी मेळ बसणारेच त्यांचे ते 27 ओळींचे वाक्य होते. काळकर्त्यांना ते तोलताही आले, पेलताही आले. सरस्वतीने वरदहस्त ठेवलेल्या काही मोजक्या विभूतिंपैकी असलेले हे एक असामान्य, अलौकिक असे व्यक्तिमत्व . हा शारदेचा मुकुटमणी. ह्या लेखात केलेल्या त्या वाक्यास वजन नाही आहे आणि म्हणून बहुधा झालेली ही प्रतिक्रिया. पण आपण ते वाक्यच वाचण्याचा प्रयत्न करुया. -- "अनेक दिवसांच्या शुभ संस्कारांनी मनाचे मालिन्य निर्मूल होते, वासना गलित होतात, भगवंताच्या चरणारविंदाचे आणि मुखारविंदाचे ध्यान स्थिरता पावू लागते, भगवंताची कृपा होऊ लागते, भगवंताची प्रत्यक्ष मूर्ती अंतःकरणामध्ये प्रकट होऊ लागते, त्याच्या त्या ओजाची नीलवर्ण निश्चित सुंदर स्तुती आपल्या डोळ्यांच्या पुढे आणि पाठीमागे, आत आणि बाहेर, या बाजूला आणि त्या बाजूला, वर आणि खाली, जिकडे पहावे तिकडे व्यापलेली दिसू लागते, तनु रोमांचित होते, कंठ सद्गदित होतो, नेत्र अश्रुपूर्ण होतात, मन वेडावून जाते, आणि या दृश्य जगाचा मात्र आधार सुटतो, परंतु त्या अदृश्य परमात्म्याचा पूर्णहस्तावलंब हस्तगत होत नाही, अशा प्रकारची जेव्हा अवस्था होते तेव्हा भक्तिरसाने अंतर्बाह्य एकाकार वृत्ती बनून जाते, तर्काच्या पायावर उभी रहाणारी बुद्धी लंगडी पडून या अल्प शरीरामधे कोंडलेले मन प्रेमातिरेकाने सर्व त्रैलोक्यामधे हर्षनिर्भर होऊन नाचू लागते, आणि हे अदृष्टपूर्व, अश्रृतपूर्व, अज्ञातपूर्व असे अंगावर शहारे आणणारे अद्भुत चमत्कार परिदृश्यमान करविणारा तो ब्रह्मांडाचा मायावी गारुडी आहे तरी कोण?आणि तो असतो तरी कोठे? अशा जिज्ञासेने मन जेव्हा त्याच्याविषयी विचार करू लागते, डोळे जेव्हा त्याला शोधू लागतात आणि,' हे देवा, हे प्रभो, हे भगवंता, हे नारायणा, अशा अनेक परींनी आपली गोंधळून गेलेली वाणी जेव्हा त्या सच्चिदानंदाला कारुण्याने हाका मारू लागते, जेव्हा मनात कोंडलेले आश्चर्य वसंत ऋतुतील तरुपल्लवांप्रमाणे अंकुरित होऊन मुखावाटे बाहेर पडू लागते, आणि जेव्हा सात्विक प्रेमरसाचा ओघ गंगानदीच्या सहस्रमुखांप्रमाणे वाणीच्या सहस्रावधी वाटांनी अ-प्रतिबद्धपणाने आणि सर्व मर्यादांचे उल्लंघन करून सैरावैरा धावू लागतो, ज्यावेळी देवाला आपण किती नावांनी हाका मारित आहो, एकाच देवाला हाका मारण्याला इतकी नावे कशाला पाहिजेत, किंवा एकदा ज्या नावाने हाक मारिली तेच नाव फिरून एखादेवेळी चुकून येत आहे की काय, असल्या क्षुद्र आणि क्षुल्लक प्रश्नांकडे लक्ष देण्याला कोणते मन जागेवर असते?" विष्णुसहस्रनामावरील आपल्या सुंदर लेखात त्यांनी लिहिलेले प्रदीर्घ वाक्य हे त्यांच्या अमोघ प्रतिभेची साक्ष होय!! कुणाला काय वाटते आहे ह्याच्या सर्वस्वी पलीकडले!! असे वाङ्मय अविष्कार दुर्मीळच!! आणि कदाचित् ह्यापुढील काळात तर कदाचित् अशक्यच!!

  4. mugdhabhide

      6 वर्षांपूर्वी

    व्यक्तिचित्रण म्हणुन लेख चांगला आहे पण त्यांच्या कामगिरीबद्दल वाचायला त्यांना ज्या लेखांसाठी शिक्षा झाली असे काही लेख वाचायला जास्त आवडेल

  5. sakul

      6 वर्षांपूर्वी

    'काळ'कर्त्यांबद्दल काही वेगळे वाचायला मिळेल, या अपेक्षेने लेख वाचला. पण लेखाने पूर्ण निराशा केली. या लेखात जी माहिती आहे, ती कळली वा ना कळली, तरी फार काही फरक पडत नाही. लेखातील परिच्छेदांचा एकमेकांशी काही संबंध नाही. लेखाच्या सुरुवातीच्या परिच्छेदात 27 ओळींचं आणि 230 शब्दांचं प्रदीर्घ वाक्य लिहिल्याचा उल्लेख आहे. केवळ चमत्कृती या पलीकडे याला काही अर्थ नाही. माणूस आधी बोलायला शिकला आणि नंतर लिहायला शिकला. एका दमात त्याला सर्वसाधारपणे जेवढे बोलायला येते, तेवढेच वाक्य असावे.

  6. Sadhana

      6 वर्षांपूर्वी

    धन्यवाद, परांजपे साहेबांचे लेख वाचायला आवडतील.

  7. maheshbapat63

      6 वर्षांपूर्वी

    आगळा वेगळा लेख।नुसते नाव ऐकून होतो।थोर व्यक्तिमत्त्व। माहिती मिळाली।धन्यवाद।

  8. anudeep

      6 वर्षांपूर्वी

    अत्यंत दुर्मिल लेख

  9. anudeep

      6 वर्षांपूर्वी

    अत्यंत दुर्मिल लेख,धन्यवाद

  10. arya

      6 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख. शिवरामपंतांचे वक्रोक्तीपूर्ण लेख मराठीचा विद्यार्थी म्हणून अभ्यासाला होते. ती भाषा लगेच कळत नसे.पण कळली की इंग्रज सरकारचे कसे वाभाडे काढले हे लक्षात येई. धन्यवाद !

  11. upd

      6 वर्षांपूर्वी

    मी पूर्वाश्रमीची ऊर्मिला वामन परांजपे. आपण सर्वांनी वरील लेखात जी, त्यांना नातू झालेली कथा वाचलीत , तो अण्णांंचा नातू म्हणजे माझे वडील वामन कृष्ण परांजपे. माझ्या वडीलांची वाड़्मय-सेवेेेची सुरवात त्यांच्या आजोबांच्या, ती. अण्णांंच्या चरित्र-लेखनाने झाली. 'मेघदूतावर नवा प्रकाश' ह्या मेघदूवरील संशोधन पुस्तकात त्यांनी आवर्जून ती. अण्णांंसाठी 'ऋणनिर्देश ' केला आहे. वडिलांच्या आठवणींतून आम्ही ती. अण्णा अनुभवले. अशा थोरांच्या प्रकाश वलयात आमचे बाल्य उजळले याचा सार्थ अभिमान आहे. महद् भाग्य म्हणून ह्या वंशात जन्मलो, वाढलो आणि जे परंपरेने लाभले ते खरोखरीच आहे शब्दातीत. ऊर्मिला प्रमोद देवधर

  12. sureshjohari

      6 वर्षांपूर्वी

    धन्यवाद ह्या दुर्मिळ लेखाबद्दल . फारच सुंदर आहे हा .

  13. Vijay S Bansod

      6 वर्षांपूर्वी

    Uttam. Gharachya vaktichya aathvani eklysarkhe vatle. Chhan vatle. Aanan zala. Samadhan pawalo. Lekhabhaddal dhnyawad aani likhanasathi shubhechhya.

  14. Anil95

      6 वर्षांपूर्वी

    फारच सूंदर.

  15. mpshah

      6 वर्षांपूर्वी

    I am from Goregaon.However this information is new to me.Thank u verymuch and request u to make available such type of articles

  16. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    असे दुर्मिळ लेख वाचायला मिळतात. धन्यवाद. लेख छान आहे.

  17. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    असे दुर्मिळ लेख वाचायला मिळतात. धन्यवाद. लेख छान आहे.

  18. Mangesh Nabar

      6 वर्षांपूर्वी

    'काळ'कर्ते परांजपे यांच्याविषयीच्या या आठवणी पुष्कळ नवीन माहिती देणा-या आहेत. हा असा लेख हुडकून आणून आम्हा वाचकांना दिल्याबद्दल आभार. मंगेश नाबर



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen