हल्लीं ब्राह्मण जातीस मोठा अभिमान आहे. त्यांस असें वाटतें कीं, आम्ही श्रेष्ठ, आमच्यासारखा कोणी पृथ्वीवर नाहीं. इतर लोक कसेही असले तरी आमची योग्यता पावणार नाहींत. परंतु जातीविषयीं कोणी गर्व करूं नये. आपलें कर्म तशी आपली जाति आहे. जात म्हणजे कर्मावरून योग्यता. क्षत्रिय म्हणजे त्यांनीं युद्ध करावें, ब्राह्मण म्हणजे त्यांनीं विद्या करावी. सोनारांनीं सुवर्णाचें काम करावें. परीट यांणीं वस्त्रें धुवावीं. हींच कामांची नांवें आणि जात. जातीची कांहीं वेगळी खाण नाहीं. सर्वांचे मूळ एक याविषयीं तुकारामाचा अभंग असा- तुम्ही नका करूं गर्व। नीज जाती म्हणुनी सर्व॥ शुक्रशोणिताची खाणी। तुम्हा आम्हा एकच योनी॥ रक्तमांस चर्महाडें। सर्वां ठायीं सम पाडें॥ अन्नउदक घरोघरीं। निष्ठा नाहीं हो दुसरी॥ तुका म्हणे हेंचि खरे। नाहीं देवाशीं दुसरें॥1॥ याजवरून उघड न्याय होत आहे कीं, जातीचा अभिमान मानणारे मूर्ख आहेत. आणि जाति व्यवहारावरून आणि कर्मावरून झाल्या आहेत, यांत संशय नाहीं, येविषयीं मनूचें वचन आहे कीं, ब्राह्मणाचा शूद्र होतो आणि शूद्राचा ब्राह्मण होतो- (अध्याय 10 वा) शूद्रायां ब्राह्मणज्जात: श्रेयसा चेत् प्रजायते। शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम्। क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यास्तथैव च॥ (65) (अध्याय 7) कुबेरश्च धनैश्वर्य ब्राह्मण्यं चैव गाधिज:॥ (42) इत्यादि वचनेंकरून असें सुचविलें आहे कीं, धर्माचे फेरफारानें क्षत्रियाचा ब्राह्मण होतो, शूद्राचा ब्राह्मण होतो, असें आहे. मग आतां जे दुसरें जातीचे लोक ब्राह्मणांचा गर्व हरण करण्याकरितां बळेंच नमस्कार करितात, बळेंच अग्निहोत्र घेतात, इत्यादि खटपट करितात. आणि ब्राह्मणांचें कर्म कोणी सुखान ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
TINGDU
7 वर्षांपूर्वीजाति अभिमान सोडला तर जाति भेद कायम राहील पण भांडण तंटे कमी होतील हे विधान पटले.
mugdhabhide
7 वर्षांपूर्वीजात कर्मावरुन ठरते असे म्हणताना ब्राम्हण आणि नीच जातीचे असा उल्लेख करण्याचा उद्देश कळला नाही. पण नक्कीच जातीविषयक द्दष्टिकोन बदलणारा लेख आहे
asmitaph
7 वर्षांपूर्वीआजही relevant असणारा लेख आहे.
arya
7 वर्षांपूर्वीलोकहितवादीचा विचार काळाच्या पुढचा विचार होता हे आज सिद्ध झाले आहे. ही सर्व शतपत्रे (शत असले तरी त्यांची संख्या शंभराहून अधिक आहे) आम्ही एम ए ला असतांना अभ्यासक्रमात होती
CHARUDATTA
7 वर्षांपूर्वीआजही हे विचार तंतोतंत लागू आहेत. मनुस्मृतीमध्ये सामाजिक परिस्थितीवर खूप उपयोगी भाष्य केले आहे हे या लेखात उद्धृत केलेल्या श्लोकांंवरून स्पष्ट होते.