विवाहिता व पूर्वाश्रम

पुनश्च    गीता साने    2018-11-17 06:00:36   

अंक: स्त्री जानेवारी १९३६

‘स्त्री’चा नोव्हेंबरचा अंक चाळीत असताना स्त्रियांचे नाव ह्या गोष्टीने माझा उल्लेख करून चर्चा केलेली आढळल्यामुळे मी हा लेख लिहिण्याचे धाडस करीत आहे. लग्नाबरोबर आपले पहिले नाव टाकून नवे घेण्याची पद्धती इतकी रूढ झालेली आहे की, लग्नानंतर वधूने नाव बदलले नसेल अशी शंकाही कोणाला येत नाही. त्याहूनही विशेष म्हणजे ‘नाव बदललेले नाही’ हे निश्चित माहीत असूनही नवऱ्याच्या नावावरच बायकोला ओळखण्याची जबरी! १९३२ मध्ये लग्न झाल्यानंतर मी नाव बदलले नाही, माझे नाव व सही पूर्वीप्रमाणेच ‘गीता जनार्दन साने’ राहिली, ह्याचे अनेकांनी अनेक अर्थ काढले आणि पुष्कळांनी माझ्या सासरच्या नावानेच माझ्याशी पत्रव्यवहार करण्याचा आग्रह दाखविला. ‘तुझं तुझ्या पतीवर प्रेम नसेल’ असे बोलण्याइतकीही शाळेच्या इन्स्पेक्टरची मजल गेली! नावासारखा क्षुल्लक प्रश्न; पण त्याला इतके महत्त्व का प्राप्त झाले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे!

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , स्त्री

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख

  2. Mukund Karkare

      4 वर्षांपूर्वी

    मराठीत मला तरी राम/ दशरथ नावावरून सीता ह्या अर्थाचे नाव मलाही आठवत नाही. काही हिंदी नावांचा उलगडा करावा ज्यांचा अर्थ सीता असा सर्वमान्य आहे. दोन हिंदी नावे - रामकली, रामप्यारी.

  3. bharatik64

      6 वर्षांपूर्वी

    छानलेख त्या काळात काय आताया बाविसाव्या शतकाच्या सुरवाती पर्यंत पण हेच आहे .स्त्री मानसिक गुलाम आहे. मला असे वाटते तिला आयुष्यभर कुणावर तरी आवलंबुन रहायला आवडतेच.आगदी आताच्या आर्थीक स्वावलंबी असलेल्या आधुनीक मुली पण. आणि सण साजरे तर आजकाल event म्हणुन करतात .

  4. shandilya_samant

      6 वर्षांपूर्वी

    छान लेख!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen