लेखक- चं. वि. बावडेकर ‘‘तुमच्या खिशातली तार तर पाहू द्या.’’ ‘‘नको-नको. तीत काही नाही.’’ ‘‘अरेच्चा, पण पाहायला काय हरकत आहे?’’ ‘‘पण नको- खरंच नको-’’ ‘‘अस्सं काय! मग मी घेणारच ती काढून.’’ आणि असे म्हणून त्याने आढेवेढे घेणाऱ्या व्यक्तीच्या खिशावर एकदम झडप घातली आणि तिच्या खिशातले कागदपत्र बाहेर काढले. त्यातला एक कागद वेगळा करून त्याने तो वाचला आणि ‘‘वा वा वा!’’ असे हर्षाचे उद्गार काढीत तो पळतच दुसऱ्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने सगळीकडे एकच बातमी पसरली. ‘‘मास्तर पास झाले... मॅट्रिकच्या परिक्षेत पास झाले...शाळेला आज सुट्टी देण्यात आली आहे. शाळा बंद... मास्तर पास... मजाच मजा-’’ गोमंतकातील असाळणे या एका लहानशा गावात तेहतीस वर्षांपूर्वी हा प्रसंग घडून आला. १९१८ सालातली ही एक लहानशी घडामोड होती. गावातल्या प्राथमिक शाळेतले एक मास्तर मॅट्रिकच्या परिक्षेत पास झाले होते, आणि सर्व गाव त्यामुळे उत्साहाने फुलून गेला होता. या मास्तरांनी संपादन केलेल्या या बहुमानामुळे हेडमास्तरांनी शाळेला सुट्टी दिली. सर्व मुले मास्तरांच्या भोवती गोळा होऊन संकोचाने गोऱ्यामोऱ्या झालेल्या त्यांच्या चेहऱ्याकडे आदराने पाहू लागली. गावात मास्तर ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. काही जाणते लोक मुद्दाम घरी येऊन त्यांना भेटून गेले आणि नुकतीच मिसरूड फुटत असलेल्या या पोरसवदा मास्तरांनी रात्री झोपी जाताना आपल्या गावी असलेल्या मातुश्रीचे भक्तिभावाने स्मरण करून व तिला मनोमय वंदन करून कृतार्थतेचा, समाधानाचा एक लांबलचक सुस्कारा सोडला. मॅट् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .