आता लक्ष दक्षिण ध्रुवाकडे

पुनश्च    प्र. न. जोशी    2018-12-21 06:00:12   

अंक - केसरी दिवाळी १९६५ उत्तर ध्रुवाच्या विजयाने खाली दक्षिण ध्रुव हादरून गेला होता. कित्येक शतके सुस्तपणे पसरलेले व बर्फाच्या थरांनी आच्छादलेले हे विस्तीर्ण खंड कुणाच्या फारसे लक्षातही नव्हते. मानवी संस्कृतीचा उदय व विकास विषुववृत्ताच्या उत्तरेस झाला. कला, व्यापार, विद्या, शास्त्रे, धर्म, नीति-विचार यांची निर्मिती व वाढ उत्तरेस झाली. त्यामुळे उत्तर ध्रुवावर सर्वांची नजर खिळून राहणे साहजिकच होते. व्यापारवृद्धीसाठी, नव्या व लहान जलमार्गांसाठी उत्तर ध्रुव हस्तगत करावा असे माणसास फार दिवसांपासून वाटत होते. तितकी निकड दक्षिण ध्रुवाची त्याला कधी वाटली नाही. शिवाय असे की रशिया, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, इंग्लंड, आईसलंड, कॅनडा हे देश उत्तर ध्रुवप्रदेशाला घेरून आहेत. त्यामुळे प्रारंभापासूनच एक प्रकारचे नाते आपणा सर्वांचे उत्तर ध्रुवाशी आहे असे त्यांना वाटल्यास नवल काय? लो. टिळकांसारख्या संशोधकांच्या मते तर कधी पूर्वीच्या काळी मानवी संस्कृतीची प्राथमिक मांडामांड ध्रुव प्रदेशातच झाली. या दृष्टीने उत्तर ध्रुव दृष्टीच्या टप्प्यांतच होताच; त्याचा शोध माणसाने घेतला हे यथायोग्यच झाले. परंतु दक्षिण ध्रुवाची परिस्थिती फार वेगळी होती. अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी अशा तीन मोठ्या महासागरांनी वेष्टिलेला हा विस्तीर्ण भूभाग कसा आहे ही जिज्ञासाच माणसांना फार उशिरा सुचली. आधी या सागरांपलीकडे काहीही नसावे हीच कल्पना असल्यास नवल नाही. कधी काळी मच्छीमारी करतांना खलाशी दक्षिणेकडे गेले तरी अमर्याद सागरापलीकडे काय आहे? हा प्रश्न त्यांच्या चिमुकल्या मनात कधी निर्माणच झाला नाही. हा विभागच साऱ्या जगातील घडामोडींपासून दूर. अतिशय थंड असा हा भूविभाग आहे की, सर्वत्र जलसंचयच आहे, याचीही कल्पना प्र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , केसरी , दीर्घा , स्थल विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen