लेखक- प्रा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
भारतात लोकसंख्येचा स्फोट झाल्यामुळे बिचाऱ्या चित्रगुप्ताला साऱ्यांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवणे कठीण झाले. अखेरीस त्यालाही ‘ऑन लाइन अकाउंट’ व ‘सेल्फ सर्व्हिस’चा आश्रय घ्यावा लागला. सकाळी उठून त्याने पाहिले, तर त्याला विविध व्यक्तींनी आपापल्या खात्यात केलेल्या खालील नोंदी दिसल्या. अंक - अंतर्नाद, सप्टेंबर २०१० पुण्य खाते मी रुग्णांसाठी औषधे बनविली. मी रुग्णांना औषधे सुचविली. मी औषधे विकली. मी औषधांविषयीचे धोरण ठरविले. मी औषधांचा दर्जा नियंत्रित केला. अखेरची नोंद एका सामान्याची होती ......... मी ह्या साऱ्यासाठी पैसे मोजले. पण त्याला स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. कारण त्याने ‘पाप’ खात्यात नोंदविले होते की - ‘मी भारतात जन्मलो, आजारी पडलो, कर्ज काढून औषध विकत घेतले व त्याच्या विपरीत परिणामामुळे मेलो.’ एकूण आरोग्यव्यवस्थेत व अर्थकारणात औषधांचे स्थान अनन्यसाधारण आहे. बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तूंमध्ये औषध ही बहुधा सर्वांत जास्त जीवनावश्यक बाब आहे. कारण जीवन व मरण ह्यांतील अंतर फक्त एक गोळी किंवा इंजेक्शनाएवढे असू शकते. औषध ही अशी एकमेव क्रयवस्तू आहे, जिच्याविषयीचा निर्णय ग्राहक स्वत: घेत नाही; ह्या निर्णयाचा अधिकार आपण स्वत:हून तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या हाती सोपविला आहे. डॉक्टरांना रुग्णाच्या हिताची व आरोग्याची काळजी असतेच. पण औषधाचे पैसे डॉक्टरांच्या खिशातून जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अनेकदा आपण लिहून दिलेले औषध रुग्णाला परवडते की नाही, नसल्यास त्याला कमी खर्चीक पण गुणकारक पर्याय आहेत की नाही, ह्या बाबींची डॉक्टरांना ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .