पहिले दान-देवाचे!


फलंदाज खेळपट्टीवर आल्यावर काही काळ सेट होण्यासाठी घेतो आणि ते सर्वमान्य आहे. कसोटी क्रिकेट आहे की वीस षटकांचा सामना आहे की पन्नास षटकांचा यावर हा सेट होण्यासाठीचा कालावधी ठरतो. असा सेट होण्यासाठीचा वेळ  प्रत्येक क्षेत्रात लागत असतो. नोकरीत, वैवाहिक आयुष्यात तसेच लेखनातही. या काळात काही चुका माफ असतात कारण त्या चुकांच्या भांडवलावरच पुढची योग्य दिशा मिळत असते, कळत असते. कवी म्हणून वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज उपाख्य तात्यासाहेब हे मराठी साहित्यक्षेत्रातले एक अनमोल लेणे आहे. त्यांचा हा सेट होण्याचा काळ त्यांनी या लेखात सांगितलेला आहे. त्यांच्या खासच शैलीत. ललितच्या १९६९ सालच्या दिवाळी अंकात  हा लेख  आला होता. ********** अंक- ललित; वर्ष- दिवाळी अंक १९६९ लक्षात राहण्यासारखे पहिले प्रकाशन झाले ते लो. टिळकांवरील एका कवितेचे. ‘लोकसत्ता’ नावाचे एक छोटे साप्ताहिक नाशिकमध्ये बरीच वर्षे निघत होते. टिळकांच्या चळवळींचा पाठपुरावा करण्यासाठी शहरातील एका नामांकित वैद्याने हे प्रत्र काढले होते. नाशकाप्रमाणे अहमदनगरचेही नाव पत्रावर असायचे. पण नगरच्या लोकसंख्येत किती भर पडली आणि किती घट झाली, या म्युनिसिपल बातमीशिवाय दुसरी काही नगर-वार्ता त्यात नसायची. लहान आकाराची चार पाने, त्यात पान-दीड पान नगरपालिकेच्या व कोर्टाच्या जाहिराती. तरीही त्या काळाच्या व गावाच्या मानाने पत्रक ठीक निघत असे आणि जिल्ह्याची म्हणून त्याला प्रतिष्ठाही होती. पुढे इतर वृत्तपत्रे निघू लागल्यावर ‘लोकसत्ता’ मोडकळीला आली आणि मालकांचे - बंद करण्याइतकेही - लक्ष नसल्याने कशीबशी चालू राहिली. याच काळात त्या पत्राने टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त एक विशेषांक जाहीर केला होता. मी हायस्कूलमध्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , अनुभव कथन , साहित्य जगत , मराठी नियतकालिके

प्रतिक्रिया

  1. jasipra

      4 वर्षांपूर्वी

    फारच छान. तात्यांच्या सूक्ष्म विनोदबुद्धीची पण या लेखात झलक दिसली



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen