लेखक – रविप्रकाश कुलकर्णी भारत-पाक फाळणीच्या झळा ज्यांना सोसायला लागल्या त्यांच्याबाबतीत ही एक कायमची भळभळती जखम होऊन बसली. त्या दुर्दैवी दशावतारांचे वर्णन अनेक लेखकांनी कथा, कादंबरी, काव्य, नाटक अशा माध्यमातून व्यक्त केले आहे. हीच वेदना एका कवीने प्रकट केली – कहते है कि आता है मुसीबत में खुदा याद हम पर तो वो गुजरी कि खुदा भी न रहा याद हा भोग ज्याच्या वाट्याला आला तो कोण होता? तर ज्याने स्वतंत्र पाकिस्तानसाठी केवळ बहात्तर तासाचा अवधी असताना तातडीने राष्ट्रगीत लिहून दिले – ऐ सरजमी ए-पाक जरै तेरे है आज, सितारों से ताबनाक रोशन है कह कहाँ से कही आज तेरी खाक ऐ सरजमी ए-पाक झाला प्रकार असा होता की, १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं. त्यामुळे महंमद अली जीनांपासून सगळयांचीच धावपळ सुरू झाली. ह्या धामधुमीत – केवळ बहात्तर तासाचा अवधी स्वातंत्र्यासाठी राहिला असता लक्षात आलं की राष्ट्रगीताची निवडच अजून केलेली नाही! अर्थात् एकच धावपळ सुरू झाली. शेवटी लाहोर नभोवाणीचे एक तालेवार उच्च अधिकारी एका तरुण २९ वर्षांच्या कवीकडे आले आणि तातडीने पाकिस्तान राष्ट्रगीत हवं अशी त्यांनी मागणी केली. हे सर्व कायदेआझम महमद अली जीनांच्या संमतीनेच आहे हे तो अधिकारी सांगायला विसरला नाही! त्या तरुण कवीला पण लगेच शब्द स्फुरले. हे राष्ट्रगीत १४ ऑगस्ट १९४७ रोजी सर्व ठिकाणी गायलं गेलं. ह्या राष्ट्रगीताचा कर्ता होता – जगन्नाथ प्रसाद! हे होत असतानाच एक नाट्य घडायला लागलं. लाहोर भारतात जाणार की पाकिस्तानात जाणार ह्याचा अंतिम निर्णय होत नव्हता. पण ‘रेडक्लिफ कमिशन’च्या अहवालानुसार लाहोर पाकिस्तानात गेलं. मुस्लिमेतर लोकांची ससेहोलपट ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayram
6 वर्षांपूर्वीखूप छान माहिती
sanjaypethe
6 वर्षांपूर्वी" जगन्नाथ आजाद " हे खरं नाव आहे. ह्या राष्ट्रगीताबद्दल youtube वर माहिती आहे. https://youtu.be/yTkspZk0K3s