मणिकांचन


अंक- माणूस; दिवाळी १९७९ दिवाळी हा हिंदूंचा सण; पण या 'हिंदू'  शब्दावरूनच वादळ माजले, वातावरण ढवळून निघाले, देश अस्थिरतेच्या अंध:कारात बुडाला, बुडवला गेला. मुळात हा शब्द ‘भौगेालिक’ आहे, असे भारतीय संस्कृती कोशाचे विद्वान संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांनी या गदारोळात एका प्रसंगी सांगितले; पण तिकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. पूर्वीही ही व्युत्पत्ती अनेकदा, अनेकांनी सांगितलेली आहे;  पण त्याही वेळी कुणी याकडे लक्ष देण्याची तसदी घेतलेली नव्हती. पन्नास वर्षांपूर्वी सावरकरांनी यासाठी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथच लिहिला; पण तोही विचारात न घेता या विषयावर वादळे अद्याप निर्माण केली जातच आहेत. हे का घडते? हेही म्हणूनच पाहावे लागते. झाड जमिनीवर उगवते हे खरे; पण जेवढ्या जमीनभागावर झाड उभे आहे तेवढी जमीन किंवा वरचे खोड म्हणजेच झाड असे कुणी म्हणू शकत नाही. तसेच या ‘हिंदू’ शब्दांचे आहे. भौगोलिकदृष्ट्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि काठेवाडपासून कामरूप-आसामपर्यंत पसरलेल्या भूभागात राहणार्‍या लोकांना ‘हिंदू’ ही संज्ञा लाभली व या अर्थाने ही संज्ञा ‘भौगोलिक’ आहे, ‘प्रादेशिक’ आहे हे खरे; पण लोक राहू लागल्यावर ते प्राण्यांसारखे नुसतेच जन्मले आणि मेले असे तर घडत नाही. ते राहतात, पोटापाण्याचा उद्‍योग करतात, कलाकौशल्यांची निर्मिती करतात, ज्ञानाची देवाणघेवाण करतात, परस्परांवर प्रेम करतात, द्वेषाने वेडे होतात, युद्ध खेळतात, राज्ये स्थापन करतात आणि यापलीकडे जाऊन ईश्वराच्या शोधासाठी हे सर्व सोडून अरण्यात, डोंगरावर निघूनही जातात. थोडक्यात जमिनीवरून वर आलेले झाडाचे खोड जसे केवळ खोड राहत नाही, त्याला पानाफुलांचा बहर येतो, फळे येऊन ते वाकते किंवा वादळवार्‍याने झोडपले ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , समाजकारण , माणूस , राजकारण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen