मनात आणले तर आय.ए.एस. आपल्या कामाच्या ठिकाणी काय करू शकतो त्याचे उदहरण आहे आय.ए.एस. अधिकारी निखील निर्मल. तसे ते केरळचे. २०११ मध्ये आय.ए.एस. झाले. आय.ए.एस. होण्याचे स्वप्न होते हे खरे पण शिक्षण, शालेय शिक्षण हा देखील त्यांचा मनापासून आवडणारा विषय. प्रशिक्षण वगैरे संपल्यावर पहिले पोस्टिंग झाले ‘अलीपूरद्वार’ नावाच्या जिल्ह्यात, पश्चिम बंगाल मध्ये. सुमारे ऑगस्ट २०१८ मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या शालेय शिक्षणाच्या ढासळत्या परिस्थिती बद्दल जाहीरपणे काळजी व्यक्त केली. त्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात ह्या विषयात काय करता येईल असा विचार करून निखील निर्मल यांनी शालेय शिक्षण संबंधी एक गैरसरकारी उपक्रम सुरु केला. आज ह्या प्रकल्पाचा फायदा जिल्ह्यामधल्या ७३ शाळांतील सुमारे २०,००० विद्यार्थी घेत आहेत. केले तरी काय निखील निर्मल यांनी? ह्या जिल्ह्यात चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांची भरपूर संख्या आहे. आत्यंतिक गरिबी, त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष्य, त्यातून बालमजुराची प्रथा, गुन्हेगारी-व्यसनाधीनता, मानवी तस्करी, मानवी अवयवांची तस्करी अशा बिकट परिस्थितीत जगणारी भरपूर लोकसंख्या आहे. निखील निर्मल यांच्या पुढाकाराने व बऱ्याच विचारमंथनातून ‘अलोरान’ नावाच्या अशासकीय उपक्रमाचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांनी पूर्वकल्पना न देता जिल्ह्यातील शाळांना भेट देण्यास सुरुवात केली. लक्षात आले की मुलांची उपस्थिती अत्यल्प आहे, शिक्षक येतातच असे नाही, शिक्षण खात्याचेही शाळांच्याकडे बिलकुल लक्ष नाही. एकंदर चार इन्स्पेक्टर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील ८४० शाळांवर ‘लक्ष्य’ ठेवायचे होते! ह्या अत्यल्प कर्मचाऱ्यांच्या जीवावर काही घडणे कठीण होते. मग निखील निर्मल यांनी अन्य खात ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Dipikashelar
6 वर्षांपूर्वीGreat sir?