नवे कोंबडीचे अंडे ऐसे घड्याळ झळकले...


' क्या बात है! ' गायक अलगदपणे समेवर येतो तेव्हा, एखादा शायर त्याच्या गझलेतल्या शेराचा शेवटचा कळीचा शब्द ऐकवतो तेव्हा, आपल्या तोंडून 'क्या बात है' अशी दाद बाहेर पडावी तशी आजचा हा लेख वाचताना ती वाक्या-वाक्याला द्यावी लागेल. घड्याळ हा या लेखाचा विषय आहे असे सांगणे म्हणजे दिशाभूल करणेच होईल. कारण निमित्त घड्याळाचे आणि लेख मात्र मनुष्य स्वभावातील खाचाखोचा सांगण्यावर. लेखाची शैली, लेखकाचे निरीक्षण आणि त्याची शब्दकळा केवळ अप्रतिम. इतका सुंदर, मार्मिक विनोद फारच क्वचित वाचायला मिळतो. यशवंत नरसिंह केळकर यांनी हा लेख लिहिला आहे. केळकरांची ओळख मुख्यतः गंभीर संशोधनपर लिखाण करणारे अशीच आहे. परंतु त्यांनी १९३५ ते १९५६ या काळात 'केसरी'त सहायक संपादक म्हणून काम करताना स्फुट लेखन केले होते. त्याच दरम्यान त्यांना आपल्यातील ललितलेखकाचा शोध लागला असावा. बरीचशी इतिहास संशोधनपर पुस्तके, शाहीरी परंपरेचा अभ्यास आणि 'म्हणी अनुभवाच्या खाणी' हे पुस्तक असा त्यांचा ग्रंथसंभार आहे. ********** अंक- मनोरंजन, दिवाळी १९३९ काळ आणि घड्याळ (मूळ शीर्षक) एका विनोदी पुस्तकात एक चुटका दिला आहे. एक जण विचारतो ‘घड्याळात आणि स्त्रियात फरक काय?’ त्यावर समस्यापूरण करणारा कोटीबाज उत्तर करतो, की ‘घड्याळाकडे पाहिले म्हणजे किती काळ गमावला याचा आपणास उमज पडतो. उलट स्त्रियांच्या तोंडाकडे पाहिले म्हणजे पळे काळाचे भानच नाहीसे होते!’ पण घड्याळाच्या तोंडाकडे केवळ काळापुरतेच नुसते न पाहता त्याच्या रूपाकडेही पाहिले तर आपले मन खचित अंतर्मुख होऊन जाईल व अनेक मनोज्ञ कल्पनांच्या परिभ्रमणांत आपलेही काळाचे भान नाहीसे होईल, यात शंका नाही. कारण खरोखरच घड्याळ ही केवढी सजीव, सुंद ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , विनोद , मनोरंजन , ललित

प्रतिक्रिया

  1. amarsukruta

      3 वर्षांपूर्वी

    लेखक हलकंफुलकं लिहिता लिहिता फार मोठं तत्त्वज्ञान अगदी सहज सांगून जातात... मला खालील वाक्यं फार भावली. ...वर्तमान म्हणजे काळाच्या समुद्रात क्षणभर गोठून गेलेल्या उदकाचा हिमनग होय. तो एका बाजूने म्हणजे भूताच्या बाजूने सारखा द्रवत असतो आणि दुसऱ्या म्हणजे भविष्याच्या बाजूने सारखा दृढ होत असतो... ...पावलापुरता का होईना पण वाट दाखविणारा प्रकाश असल्यामुळे प्रवासी भविष्यात पुढे पुढे घुसतच असतो आणि त्यामुळेच प्रतिक्षणाला त्याचा वर्तमानकाळ बदलतच असतो... ते म्हणतात की "लौकिकरीत्या वर्तमानकाळाचेच जगाला अधिक महत्त्व वाटावे हेही सहाजिकच आहे आणि जगातील प्रत्येक व्यक्ती कोणच्याही हेतूकरता असो वर्तमानकाळाचा प्रत्येक क्षण कारणी लावण्याचा प्रयत्न करीत असते..." हे विधान आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं कारण ज्याला वर्तमानाचं महत्त्व वाटलं त्याने घड्याळ शोधलं खरं पण आपण ते वापरताना 'वर्तमान काळाचे' अर्थात "वेळेचे" महत्त्व ओळखू लागलो तर उपयोग.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen