मराठी भाषा आता फक्त राजकारण करण्यापुरती उरत्ये की काय, असं सभोवतालचं वातावरण आहे. येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्ही नक्की काही संकल्प केले असतील. मग त्यात आपली 'मराठी भाषा टिकवण्याच्या' संकल्पाची एक छोटीशी भर टाकणार का? प्रत्येक माणूस जन्माला आल्यावर हळूहळू बोलायला शिकतो. तो बोलायला लागण्यामागे त्याच्या आजूबाजूला असलेल्या 'बोलणाऱ्या' लोकांचा खूप मोठा वाटा असतो. कानावर पडणारी भाषा, भाषेचा लहेजा, भाषेचा नाद, भाषेची लय, त्या भाषेतली गाणी हे सगळं ते लहान मूल आत्मसात करत असतं. त्यामुळे तुम्ही कुठल्या भाषिक आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात यापेक्षा तुमचं बालपण कुठल्या लोकांच्या सान्निध्यात गेलं हे जास्त कळीचं ठरतं. ज्यांचे बालपण त्यांच्याच भाषेच्या लोकांमध्ये गेलं त्यांच्यासाठी ही खूप सहज प्रक्रिया असते. मात्र ज्या लोकांच्या पर-देशात किंवा पर-राज्यात बदल्या होतात त्यांना हा मुद्दा नक्की पटेल. आपल्या बहुतांशी लोकांच्या आयुष्यात मराठीचे संस्कार आपोआप झाले. 'We should talk marathi at least at home so he will get familiar to some marathi words' ही हल्ली ऐकू येणारी वाक्यं आपल्या आईवडिलांना उच्चारावी लागली नसावीत. मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम हा गोंधळ आपल्या बहुतांशी पालकांच्या मनात कधीच नव्हता. अत्यंत मराठमोळ्या वातावरणात आपलं बालपण गेलं. आजही मनातल्या मनात हिशेब करताना आपण अगदी सहजपणे 'आठ चोक बत्तीस' म्हणून जातो. (फक्त आपल्या मराठी संस्कृतीने पहिल्याच पाढ्यासाठी गुजराती 'बे' का स्वीकारलाय हे एक न सुटलेलं कोडं आहे). समोर पडलेल्या वर्तमानपत्राच्या ढीगातून आपण वाचण्यासाठी अगदी सहज मराठी वर्तमानपत्र निवडतो. या सर्व कृती आपल्या हातून इतक्या सहज घडतात की हे करत असताना 'आपण ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषा
, फेसबुक
, मुक्तस्त्रोत