पानिपतच्या पराजयाची मीमांसा


अंक - सह्याद्री, मार्च १९६८ पानिपतचे युध्द आणि पराभव हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक दुखरा अध्याय आहे. वाताहत होणे या अर्थाने 'पानिपत होणे' हा शब्दप्रयोगही त्यानंतर रुढ झाला, जो आजही वापरला जातो. गेली जवळपास २५० वर्षे या विषयावर शेकडो लेख लिहिले गेले, ग्रंथ लिहिले गेले त्यातून या पराभवाच्या अनेक उजळ बाजू पुढे आल्या आहेत. मराठ्यांची युद्धनीती, राजकीय डावपेच यांचे दाखले देत पानिपतच्या लढाईतील कथित चुकांचे खुलासेही अनेकांनी केले आहेत. या युद्धातील पराभवाच्या अशाच बाबींचे सविस्तर विवेचन करणारा, अभ्यासक श्री. सुंदरभाई बुटाला यांचा पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला हा लेख इतिहासातील काही वाद असे असतात की, ते केव्हा संपतच नाहीत. उभय पक्षी तेच तेच मुद्दे पुढे मांडले जातात, पूर्व-पक्ष उत्तर-पक्ष होतात व शेवटी वाद अनिर्णितच राहतो. १७६१ मध्ये पानपतच्या समरभूमीवर मराठे व गिलचे यांची लढाई झाली. मराठ्यांचा पराजय झाला आणि संबंधित राष्ट्रपुरुषाच्या गुणदोषांचे मूल्यमापन आणि पराभवाच्या कारणांची मीमांसा, आज त्या घटनेला दोनशे वर्षे होऊन गेली तरी चालूच आहे. अनेक घटनांकडे अनेक दृष्टिकोनांतून पाहिले जाते व त्यातून असे वाद निर्माण होता. पानपत प्रकरणाबाबत असेच झाले. पानपतची लढाई १७६१ मध्येच सुरू झाली. पण पानपत प्रकरण त्यापूर्वी कित्येक वर्षे सुरू झाले. सय्यद बंधूंच्या दिल्लीतील राजकारणांत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी हस्तक्षेप केला, तेव्हापासूनच पेशवाईतील मराठ्यांचे दिल्लीचे राजकारण सुरू झाले. बाजीराव पेशव्यांचेही अखिल भारतीय राजकारणातील धोरण लक्षात घ्यावयास हवे. भारतात स्थायिक झालेले मुसलमान व मुसलमानी राजवटी ह्या एतद्देशीयच समजावयाच्या, शक्य तेथे त्यांचे मुलुख ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , सह्याद्री

प्रतिक्रिया

  1. Shashikant Pattar

      6 वर्षांपूर्वी

    Today I have paid subscription Rs.200/- I want to read



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen