एखाद्या व्यक्तीला सर्किट म्हटले जाते ते त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे. परंतु अनेक व्यक्तींचा विक्षिप्तपणा हा दिसायला विचित्र, अनाकलनीय तरी अंतिमतः समाजोपयोगी असतो. अशी माणसे समाजात हवी असतात आणि ज्यांना हे कळते ते त्यांचा विक्षिप्तपणा प्रसंगी अपमान सहन करुनही समजून घेतात. अशा व्यक्तींवर लिहिलेले व्यक्तिरेखात्मक लेख लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत दहा वर्षांपूर्वी कुमार केतकर संपादक असताना वर्षभर प्रसिद्ध झाले होते. त्यातील हा एक लेख. गांधीजींनाही ज्यांच्या युक्तिवादाची भीती वाटली होती आणि संगीतातलं ओ की ठो कळक नसूनही जे संगीतातील पीएचडीसाठी मार्गदर्शकही झाले होते, अश्या गो.म.जोशी नामक एका ' सर्किट ' गृहस्थावर अनंत देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख- ********** अंक – लोकरंग - २० नोव्हेंबर, २०११ बी.ए. (ऑनर्स) माणसाला ‘पंडित’ ही उपाधी कशी बरे लाभेल? गाण्यामध्ये आपण भीमसेन जोशींच्या मागे ‘पंडित’ ही उपाधी सहजी लावतो. पण कोणीही सोम्यागोम्या आपल्या नावामागे ‘पंडित’ उपाधी लावताना पाहून भीमसेन जोशींनी पुणे विद्यापीठातील अध्यासनाला आपले नाव देताना ‘पंडित’ ही उपाधी न वापरण्याविषयी सूचना दिल्या होत्या. मग पुण्याच्या कॅम्प भागातील सेंट व्हिन्सेंट शाळेत गणित हा विषय शिकविणाऱ्या गो.म. जोशींना ‘पंडित’ का बरे म्हणत? शाळेत गणित शिकवणे हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. पण गो.म. जोशी घरी आले की त्यांचे रूप वेगळे असे. घरीही ते गणिताचे वर्ग चालवीत. पण त्यांच्या वर्गात ३०-४० मुले येऊन बसली आहेत आणि ती सगळी ९वी-१०वीचीच आहेत, असे या वर्गाचे स्वरूप नसे. त्यांच्या एस.पी. महाविद्यालयाजवळील बादशाही बोर्डिंग हॉटेलसमोरच्या रस्त्यावरील घराच्या हॉलमध्ये पाच-दहा मुले अ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Bhalchandra-Wangnekar
5 वर्षांपूर्वीतपशील पूर्णपणे लक्षात होता. नावें आठवत नव्हती. तुमच्यामुळे पुन्हा एकदा जोशी सर भेटले. धन्यवाद.
Abhijit Mohire
6 वर्षांपूर्वीकिरण भिडे व समूह, मला हवा असलेला लेख आत्ताच सापडला. http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170821:2011-07-15-20-03-02&Itemid=1
अभिजित मोहिरे
6 वर्षांपूर्वीकदंब नावाच्या घरात पुण्यात राहणारे एक सर्किट गृहस्थ; त्यांच्या लेखाचे नाव विसरलो आहे, त्यामुळे शोधता येत नाही. मदत करावी.
6 वर्षांपूर्वी
कदंब नावाच्या घरात पुण्यात राहणारे एक सर्किट गृहस्थ; त्यांच्या लेखाचे नाव विसरलो आहे, त्यामुळे शोधता येत नाही. मदत करावी.
harshadp
6 वर्षांपूर्वीखूप भारी लेख! smartphone वरून पाहिले असता लोकसत्ता वेबसाईटवर इतर लेख उघडत नाहीयेत. एव्हाना गायब झालेत का? Regards, Harshad.
किरण भिडे
6 वर्षांपूर्वीछान, तुम्ही इथे यादी दिल्यामुळे इतर लेख टाकायचे आमचे कष्ट वाचले. बाकी प्रस्तुत लेख आम्हाला अ.पां.देशपांडे यांनी स्वतःच पाठवला होता त्यामुळे शोधायला लागला नव्हता. फक्त dtp करून घेतले. गुगल वर उपलब्ध आहेत म्हटल्यावर सगळ्यांनाच वाचता येतील. खूप धन्यवाद...
milindKolatkar
6 वर्षांपूर्वीतरी म्हंटलं, असं होईल कसं! २०११ मधलं ते संकलन सापडलं. क्षमस्व. भिडेसाहेब, पण आपली काहीतरी गडबड झालीय. प्रस्तुत लेख / मालिका २०११ मध्ये प्रसिद्ध झाला होता / होती... पहा - https://goo.gl/jwLDvC एकूण ५२ लेख आले होते 'सर्किट' शीर्षकाअंतर्गत. रसिकांसाठी इथे त्यांची यादीच देत आहे... कागदा शिवाय कसा जगू? , स्टेशनं , असेही एक ‘रवी’शंकर!, जोशी गुरुजी, ओतप्रोत पुणेरीपण, सॅलड, संशियत ‘कमर्योगी’!, अफलातून डॉ. अढिया , तक्रारखोर! , पुतळा क्षात्रतेजाचा! , हरफनमौला , मायकल किन्नर! , भाषेचं सर्किट , अहाहा! महामोहपाध्याय! , एक सुसंःकृत चक्रमपणा , नशा एखाद्याची! , विक्रमी दावेदार! , घाऱ्या परांजपे आणि त्याचे घोडे , अवलिया , अफलातून , हिशोब नसणारा गणिती! , मळा माणुसकीचा! , ‘तोच’ मी बदनाम! , कठीण काय? , सर्किट हाऊस! , पॅट्रीक ब्रेग्स , असाही पुरुषावतार , मी २४ तास , एकांडे शिलेदार , माई , सरमळकर , सडाफटिंग , बेबीताई , आजचे कर्वे , जयू , ओसाडगावचा राजे! , अनी , िवजुभाई , िवतु बरवा , ज्ञािनयाचा राजा! , बाळू , नॉट ओन्ली ग्रंथवेडा.. , शॉर्ट सर्किट , बुिद्धमती की..?, 'पंडित' गो.म. जोशी (वरील लेख), हरिभाऊ , टॅक्सीवाले िशधये , ज्ञानाचं गार्निशिंग , एक ‘एन्टम’ माणूस , अत्रंग बाँग. लेखाच्या नावाने गुगल केल्यास / शोधल्यास मिळू शकतील. कारण ते आजही उपलब्ध आहेत!!! बाकी मजा आली! धन्यवाद. -मिलींद विशेष सूचना, गरजे प्रमाणे ही comment आपण संपादित करू शकता, edit करू शकता.
किरण भिडे
6 वर्षांपूर्वीअशा प्रतिक्रिया वाचल्या की कष्टाचे चीज झाले ( असं का म्हणत असतील ना? पण असो..) असे वाटते. इतरही लेख आहेत त्या मालेतले. टाकू हळूहळू...:-)
milindKolatkar
6 वर्षांपूर्वीव्वा! हे आणि असेच लेख ‘बहुविध’चे सभासदत्व किती उपयोगी आहे हे सिद्ध करतात. खरंतर मी ‘लोकसत्ता’चा नियमित वाचक. पण हा लेख वाचल्याचं स्मरणातून गेले होते. अर्थात, दहा वर्ष झालीत म्हणा... धन्यवाद. लेखकाचा – अनंत देशपांडे यांचा विनय ही भावला. किती सहज ते सांगतात: “...म्हणाले, ‘पांडुरंगशास्त्रींकडे (माझ्या वडिलांकडे) जा आणि त्यांच्याकडून संगीत रत्नाकराचे ग्रंथ घेऊन ये.’ “ आता, एक म्हणजे ‘गो.म.’यांविषयी अधिक माहिती मिळवली पाहिजे, आणि दुसरे म्हणजे संपादक महोदय, त्या लेखमालेत अशी ‘रत्न’ अजूनही असतील. आम्हाला त्यांचाही परिचय व्ह्यायला हवा! आमचा हट्ट आहे असे समजा!! :-) धन्यवाद. -मिलींद
manisha.kale
6 वर्षांपूर्वीपंडित गो.म. जोशी यांचा लेख केवळ अप्रतिम. लेख वाचून एका अदभूत आणि महान व्यक्तीची महती समजली. लेखक अनंत देशपांडे यांनी पंडित गो.म. जोशी यांची व्यक्तीरेखा त्यांच्या सशक्त लेखणीतुन अनेक बारकाव्यासहित अगदी हुबेहूब समोर उभी केली आहे. पंडित गो.म. जोशी यांनी पंडित या पदवीचा सन्मान unchavala असे वाटते.त्यांना नुसते पंडित नव्हे तर prakand पंडित म्हणावे असं वाटतं. अशा चांगल्या अर्थानी सर्किट असणाऱ्या व्यक्तीनमुळेच समाज सजग होण्यास मदत होते. वर्षाच्या सुरवातीलाच एका अत्यंत विद्वान माणसाचे व्यक्तीचित्र वाचायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद !!!