'कविता करणे ' आणि 'कविता कळणे'; दोन्ही दिसताना सोपे भासते आणि प्रत्यक्षात मात्र ते सारखेच अवघड असते. 'काव्य समीक्षकाने कवितेला रसिकाच्या बिछान्यापर्यंत पोचवण्याचे काम करावे, मग रसिक तिचा भोग घेतो' असे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. प्रस्तुत लेखात प्रल्हाद देशपांडे यांनी ते काम अत्यंत चोखंदळपणे आणि सौंदर्यदृष्टीनं केलं आहे. बापटांच्या काव्यातील सेैबेरियामधील बुलबुलची प्रतिमा, पु.शी रेग्यांच्या कवितेतला शृंगार आणि धामणस्करांची अचंबित करणारी कल्पनासृष्टी यांत आपण या लेखाचा हात धरुन विहार करतो; आणि कवितेला सर्वार्थानं आपलंसं करतो. कविता...अशी कळावी! अंक-आरोग्य संस्कार काही कविता वाचतांना त्यांचा रसभरीत आस्वाद घ्यायचा असेल तर रसिक वाचकांनी स्वत: आपल्या मनाला कल्पनेच्या आणि प्रतिभेच्या आकाशात स्वैर सोडायला हवं. कवितेतल्या शब्द , प्रतिमा, लय, आकृतिबंध आदींच्या सौष्ठवाबरोबर प्रतिमांची अनेक रूपं परिदर्शकातून दिसणार्या बहुरंगी आणि बहुआयामी काचतुकड्यांसारखी पाहण्याचा सराव केला पाहिजे. वसंत बापट हे बहिर्मुखी कवी. त्यांची लाघवी आणि ठसकेबाज शब्दकळेवर मोठी हुकमत. त्यांची ’ बुलबुल ’ ही कविता आपण वाचूया. ' बुलबुल ' सैबेरियामधला बुलबुल थंडीनेच घायाळ झाला दक्षिणमुखी वार्यावरून माझ्या बागेमधे आला आंब्यावरती मोहोर होता पळस लालेलाल सारे सुगंधाने आळसावलेले वाहत होते मंद वारे सुखावलेले खुळे पाखरू इथे रमले चार घटका परत घरी जाता जाता लावून गेले मला चटका हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कविता रसास्वाद , आरोग्य संस्कार
प्रतिक्रिया
कवितेची कथा ३
पुनश्च
प्रल्हाद देशपांडे
2019-01-16 06:00:47
asmitaph
6 वर्षांपूर्वीसुंदर लेख.
asmitaph
6 वर्षांपूर्वीकिती छान आस्वादक समीक्षा आहे. Let's have more articles like this one !!!!